वॉशिंग्टन- अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथील सबवे स्टेशनवर मंगळवारी सकाळी काही जणांनी अनेकांवर अंदाधुंद गोळ्या ( fire at subway station in Brooklyn ) झाडल्या आहेत. घटनास्थळावरून स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. ब्रुकलिन शहराच्या अग्निशमन विभागाने ही ( New York City Fire Department spokesperson ) माहिती दिली आहे.
न्यूयॉर्क शहर अग्निशमन विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सनसेट पार्कजवळील 36 स्ट्रीट स्टेशनमधून धुराचे लोट ( fire at 36th Street station ) आल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली आहे. घटनास्थळी अनेकांना गोळ्या घालण्यात आल्या ( Fire incident in USA ) आहेत. स्फोटके जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासनातील एका सूत्राने सांगितले की संशयित आरोपी हा बांधकाम मजुराच्या गणवेशात होता. स्थानकाच्या फरशीवर काही लोक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले फोटो समोर आले आहेत. मात्र, घटनेबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. न्यूयॉर्क पोलिसांच्या माहितीनुसार त्यांना स्टेशनवर गोळीबार होऊन काही लोक जखमी झाल्याची ( Multiple people shot at brooklyn ) माहिती मिळाली.
हेही वाचा-Murder in Punjab: कबड्डी सामन्यात गोळीबार; आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची सार्वजनिक ठिकाणी हत्या
हेही वाचा-Man shoots wife : पत्नीवर गोळीबार; झारखंडच्या हजारीबागमधील प्रकार
हेही वाचा-हळदीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार; नवरदेवासह मित्राला घेलते ताब्यात