ETV Bharat / international

Maldives Elections : मालदीवमध्ये चीन समर्थक मुइज्जू बनू शकतात नवे राष्ट्रपती, भारतासोबतच्या संबंधांवर काय परिणाम होईल? - mohamed muiz

Maldives Elections : मालदीवमध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर भारत आणि चीन दोघांचही लक्ष होतं. मात्र, आतापर्यंतच्या ट्रेंडवरून चीन समर्थक मानल्या जाणाऱ्या मोहम्मद मुइज्जू यांना यश मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. वाचा संपूर्ण बातमी...

Mohamed Muizzu
मोहम्मद मुइज्जू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 3:06 PM IST

माले (मालदीव) Maldives Elections : विरोधी पक्षाचे उमेदवार मोहम्मद मुइज्जू यांनी शनिवारी मालदीवच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलंय. त्यांना ५३ टक्क्यांहून अधिक मतं मिळाली.

Maldives opposition candidate Mohamed Muiz wins presidential runoffमालदीव निवडणूक

१८,००० हून अधिक मतांनी विजयी : ही निवडणूक एखाद्या आभासी जनमत चाचणीसारखी होती. भारत आणि चीनसाठीही ही निवडणूक महत्त्वाची आहे. रिपोर्ट्सनुसार, विद्यमान अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांना ४६ टक्के मते मिळाली. तर मुइज्जू यांनी १८,००० हून अधिक मतांनी विजयी झाले. हे ट्रेंड समोर आल्यानंतर मुइज्जू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मालदीवचं स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी काम करणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, हा विजय अशा वेळी मिळाला आहे जेव्हा आम्ही आमचे मतभेद बाजूला ठेवले. आपल्याला शांततामय समाजात राहण्याची गरज आहे, असं त्यांनी नमूद केलं.

Maldives opposition candidate Mohamed Muiz wins presidential runoff
मालदीव निवडणूक

मुइज्जू यांचा विजय अनपेक्षित : मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुइज्जू यांच्यासाठी हा आश्चर्यकारक विजय आहे. त्यांचा निवडणूक प्रचार अंडरडॉग म्हणून सुरू झाला. मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेले माजी राष्ट्रपती यामीन यांना सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक लढवण्यास मनाई केली होती. त्यानंतर मुइज्जू यांना उमेदवारी मिळाली. मात्र, यामीन यांच्या समर्थकांचं अजूनही मत आहे की, त्यांना राजकीय कारणांमुळे तुरुंगात टाकण्यात आलं आहे.

भारतावर काय परिणाम होईल : मुइज्जू यांनी विद्यमान अध्यक्ष सोलिह यांच्यावर मालदीवमध्ये भारताला अनियंत्रित सूट दिल्याचा आरोप केला होता. मुइज्जूंचा पक्ष, पीपल्स नॅशनल काँग्रेसकडे चीन समर्थक म्हणून पाहिलं जातं. मालदीवमध्ये भारतीय सैन्याची उपस्थिती केवळ दोन सरकारांमधील करारानुसार होती, असं सोलिह यांनी म्हटलं होतं. मुइज्जू यांनी आपल्या निवडणूक प्रचारात वचन दिलं होतं की जर ते निवडणूक जिंकले तर ते मालदीवमधून भारतीय सैन्य काढून टाकतील. यासोबतच देशाचे व्यापारी संबंध संतुलित ठेवले जातील, जे सध्या भारताच्या बाजूनं अधिक कललेले आहेत.

हेही वाचा :

  1. Maldives Presidential Election : चीन समर्थक की भारत समर्थक, मालदीवचे लोक कोणाला राष्ट्रपती म्हणून निवडतील?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.