ETV Bharat / international

लीला मोटली: बुकर पारितोषिकांच्या यादीतील सर्वात तरुण लेखिका

20 वर्षीय लीला मोटली ही बुकर पुरस्काराच्या दावेदारांपैकी एक आहे. ती आतापर्यंतची सर्वात तरुण लेखिका आहे, जिचे नाव या पुरस्काराच्या दावेदारांमध्ये आहे. लीला मोटलीबद्दल सविस्तर जाणून घ्या.

author img

By

Published : Aug 1, 2022, 2:18 PM IST

बुकर पारितोषिकांच्या यादीतील सर्वात तरुण लेखिका

नवी दिल्ली: ऑकलंड, कॅलिफोर्निया येथे जन्मलेल्या लेखिका लीला मोटली. अवघ्या 20 वर्षांच्या मोटली 2022 च्या बुकर पुरस्काराच्या दावेदारांपैकी सर्वात तरुण लेखिका आहेत. सध्या सर्वोत्कृष्ट कादंबरीच्या यादीत स्थान मिळवलेल्या लीला यांच्या 'नाईटक्रॉलिंग' या कादंबरीने जागतिक साहित्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अमेरिकन पोलीस व्यवस्थेत न्यायाच्या अपेक्षेने अस्पृश्य मानल्या जाणार्‍या कृष्णवर्णीयांना आणि देह व्यापार करणारे अर्थात सेक्सवर्कर्सना कोणत्या प्रकारच्या छळाचा सामना करावा लागतो, याचे कथानक या कादंबरीत आहे. 'नाईटक्रॉलिंग' ही लीला मोटली यांची पहिली कादंबरी आहे. प्रसिद्ध टीव्ही प्रस्तुतकर्ता आणि निर्माती ओप्रा विन्फ्रेची 'ओप्राह बुक क्लब', मध्ये ही कादंबरी आहे. ही कादंबरी वाचकांना ऑकलंडमधील एका 17 वर्षांच्या मुलीच्या जगात घेऊन जाते. ऑकलंडमध्ये राहणारी कियारा जॉन्सन हिची ही कथा आहे. कृष्णवर्णीयांचे तेथील जगच त्यातून समोर येते. कृष्णवर्णीय लोकांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या न्याय व्यवस्थेतच कियारा पोलिसांच्या लैंगिक हिंसाचाराची कशी बळी ठरते हे कथेतून दिसते. तिचे स्वतःचे कुटुंब या व्यवस्थेचे कसे बळी ठरते, हे 'नाइट क्रॉलिंग'चे कथानक आहे.

जगण्याची धडपड किआराला बाल सेक्स वर्कर बनवते. परंतु असे असूनही ती तिच्या शेजारच्या नऊ वर्षांच्या निराधार मुलाला वाढवते. तिला तिच्या आईने सोडलेले असते. या संघर्षात कियारा खंबीरपणे उभी राहते आणि व्यवस्थेच्या दडपशाहीपुढे झुकण्यास नकार देते. हेच या 'नाईटक्रॉलिंग'चे खरे सौंदर्य आहे. जे लीलाने वेगळ्या पद्धतीने मांडले आहे. ऑकलंडमधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या चिठ्ठीत काही गोष्टी उलगडतात. त्याचाच धागा पकडून लीला मोटले यांनी कथानक रंगवले आहे. पोलीस यंत्रणेत लैंगिक छळ कसा होतो हे त्यांनी सांगितले आहे. या चिठ्ठीमध्ये महिलांचा शोषण घोटाळा उघड झाला आणि ते त्यांच्या कादंबरीचे कथानक बनले. लीलाच्या संवेदनशील डोळ्यांनी यातील भयाण वास्तव जगापुढे कादंबरीच्या रुपाने आणले.

दोन कादंबर्‍या लिहिल्या आहेत: लीला वयाच्या 16 व्या वर्षी ऑकलंडची तरुण कवयित्री म्हणून निवडली गेली होती. तिने तिच्या 17 व्या वाढदिवसापूर्वी 'नाईटक्रॉलिंग' लिहायला सुरुवात केली होती. तिने हायस्कूल पास होईपर्यंत या कादंबरीची कथा जवळजवळ पूर्ण केली होती. नाईटक्रॉलिंग ही तिची पहिली प्रकाशित कादंबरी असू शकते. परंतु तिने 14-15 वर्षांच्या वयात आधीच दोन कादंबऱ्या लिहिल्या आहेत. लीला मोटली, तिच्या वडिलांकडून तसेच नोबेल पारितोषिक विजेते टोनी मॉरिसन, टोनी केड बाम्बारा, जॅकलिन वुडसन आणि जेसॅमीन वार्ड यांच्याकडून ती प्रभावित झाली आहे. सध्या तिच्या पहिल्या कविता संग्रहावर काम करत आहे. लीला एका साहित्यिक आणि सर्जनशील कुटुंबातील आहे. तिचे वडील एक प्रसिद्ध नाटक लेखक आहेत. लीलाला कळायला लागल्यापासून तिच्या वडिलांना लिहिताना पाहिले आहे. यामुळे तिला तिचे कलात्मक स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळाली.

लीलाच्या आधी, ब्रिटिश कादंबरीकार जॉन मॅकग्रेगर यांनी 2002 मध्ये सर्वात तरुण लेखक म्हणून बुकरच्या यादीत स्थान मिळवले होते. त्यावेळी त्यांची पहिली कादंबरी 'इफ नोबडी स्पीक्स ऑफ रिमार्केबल थिंग्ज' या यादीत समाविष्ट करण्यात आली होती. तथापि, बुकर पारितोषिक मिळविणाऱ्या सर्वात तरुण लेखिकेचे शीर्षक न्यूझीलंडच्या एलेनॉर कॅटोन यांच्याकडे आहे, ज्यांनी 2013 मध्ये तिच्या 'द ल्युमिनरीज' या कादंबरीसाठी £50,000 चे पारितोषिक जिंकले होते. या साहित्यिकांची नावे 26 जुलै रोजी जाहीर करण्यात आली होती. 2022 आणि स्पर्धात्मक यादी 6 सप्टेंबर रोजी जाहीर होईल. यानंतर 17 ऑक्टोबर रोजी लंडनमधील राऊंड हाऊसमध्ये बुकर पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा केली जाईल.

हेही वाचा - क्रुरतेचा कळस..! 'आयएसआयएस'च्या दहशतवाद्यांनी एका महिलेला तिच्याच मुलाचे मांस खायला दिले

हेही वाचा - Leave application for good news: पोलीस हवालदाराने 'गुड न्यूज'साठी केला रजेचा अर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.