ETV Bharat / international

Shinzo Abe last farewell : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना दिला अखेरचा निरोप - शिंजो आबे यांना दिला अखेरचा निरोप

जपानी लोकांनी मंगळवारी माजी पंतप्रधान शिंजो आबे ( Former Prime Minister Shinzo Abe ) यांना अखेरचा निरोप दिला. आज कुटुंबीयांच्या उपस्थितीत मंदिरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Shinzo Abe
Shinzo Abe
author img

By

Published : Jul 12, 2022, 3:21 PM IST

टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना मंगळवारी अखेरचा निरोप ( Former PM Shinzo Abe last farewell ) देण्यात आला. आज कुटुंबीयांच्या उपस्थितीत मंदिरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देशातील सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले आबे शुक्रवारी पश्चिमेकडील नारा शहरात निवडणूक प्रचारासंदर्भात भाषण देत होते. त्यादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्याच्या हत्येने संपूर्ण देश आणि जग हादरले होते.

दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यापासून सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेल्या अबे यांना अंतिम श्रद्धांजली देण्यासाठी टोकियोमधील जोजोजी मंदिराबाहेर मोठ्या संख्येने लोक जमले ( Large crowd gathered outside Jojoji Temple ) होते. आबेंचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या गाडीला फुलांने सजवले होते. तसेच इतर वाहनांचा देखील ताफा जोजोजी मंदिराकडे निघाला तेव्हा शोक करणाऱ्यांनी हात हलवले. तसेच काहींनी आपल्या स्मार्टफोनमध्ये त्यांच्या दिवंगत नेत्याचे फोटो काढले आणि काहींनी 'आबे सान!' असा नारा दिला. अंत्यसंस्काराच्या वेळी आबे यांच्या पत्नी अकी अबे, कुटुंबातील इतर जवळचे सदस्य, पंतप्रधान फुमियो किशिदा आणि पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

हेही वाचा - NASA : नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने घेतलेले विश्वाचे पहिले रंगीत चित्र प्रसिद्ध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.