ETV Bharat / international

Indian origin killed in Hamas attack : हमासच्या हल्ल्यात भारतीय वंशाच्या दोन इस्रायली महिला सुरक्षा अधिकारी ठार - killed in hamas attack

Indian origin killed in Hamas attack : हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जातंय. दरम्यान, 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यात भारतीय वंशाच्या दोन इस्रायली महिला सुरक्षा अधिकारी ठार झाल्याची माहिती समोर आली.

Indian origin killed in Hamas attack
Indian origin killed in Hamas attack
author img

By PTI

Published : Oct 16, 2023, 7:31 AM IST

जेरुसलेम Indian origin killed in Hamas attack : इस्रायलच्या दक्षिण भागात 7 ऑक्टोबर रोजी हमासनं केलेल्या भीषण हल्ल्यात भारतीय वंशाच्या दोन इस्रायली महिला सुरक्षा अधिकारी ठार झाल्या आहेत. अधिकृत सूत्रांनी आणि भारतीय समुदायातील लोकांनी रविवारी याला दुजोरा दिलाय. अधिकृत सूत्रांनी सांगितलं की, 22 वर्षीय लेफ्टनंट ऑर मोसेस, अश्दोदच्या होम फ्रंट कमांडची कमांडर आणि पोलिसांच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टची सीमा पोलीस अधिकारी इन्स्पेक्टर किम डोकरकर 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यात ठार झाल्या आहेत. या दोन्ही महिला अधिकाऱ्यांचा युद्धात लढताना मृत्यू झाल्याचं बोललं जातय.

  • They rain rockets and bullets on us. We rain leaflets on them telling innocents to leave their homes.

    There is no proportionality in this war. There’s evil and then there’s those fighting against it. pic.twitter.com/QzGvS9O5WC

    — Israel ישראל 🇮🇱 (@Israel) October 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तरुणीनं सांगितली आपबीती : सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युद्धात आतापर्यंत 286 जवान आणि 51 पोलीस अधिकारी शहीद झाले आहेत. ही संख्या वाढू शकते. कारण इस्रायलकडून मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. हरवलेल्या किंवा अपहरण केलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे. या हल्ल्यात शहाफ टॉकर ही 24 वर्षीय महिला तिच्या मैत्रिणीसह थोडक्यात बचावली होती. तीनं वाचल्यानंतर तिची आपबीती सांगितली. शहाफचे आजोबा याकोव्ह 1963 मध्ये वयाच्या 11 व्या वर्षी मुंबईतून इस्रायलमध्ये स्थायिक झाले. त्यांनी सांगितलं की त्यांची नात अजूनही धक्क्यामध्ये आहे. मानसिक वेदनांमुळे ती बोलू शकत नाही. याकोव्ह उत्तर इस्रायलमधील पेटा टिकवा येथे राहतात. त्यांनी सांगितलं की, शहाफनं रेव्ह म्युझिक पार्टीत हत्याकांडात मारल्या गेलेल्या तिच्या काही मित्रांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. हमासनं केलेल्या हल्ल्यात या पार्टीतील 270 तरुणांचा मृत्यू झाला होता.

आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू : इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझातील अनेक जण जखमी झाले आहेत. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात आतापर्यंत सुमारे 2200 पॅलेस्टिनींना आपला जीव गमावावा लागलाय. तर जखमींची संख्या सुमारे 8700 आहे. मृतांमध्ये 700 मुलांचाही समावेश असल्याचं सुत्रांनी सांगितलंय. वेस्ट बँकमध्ये आतापर्यंत 50 पॅलेस्टिनींचा मृत्यू झालाय. हमासच्या हल्ल्यामुळं इस्रायलमधील मृतांची संख्या 1300 वर पोहोचलीय, तर 3400 लोक जखमी आहेत.

हेही वाचा :

  1. Israel Hamas War : युद्धाचा आठवा दिवस; गाझाच्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलच्या आवारात जमले हजारो लोकं
  2. Operation Ajay : इस्रायलहून चौथं विमान भारताला रवाना; आजपर्यंत किती भारतीय मायदेशात परतले वाचा
  3. Israel Hamas War : इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या हवाई दलाचा प्रमुख ठार, पॅलेस्टिनी नागरिकांचं दक्षिण गाझाकडे स्थलांतर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.