ETV Bharat / international

Israel Palestine Conflict : हमासचा हल्ला रोखण्यात आम्ही अपयशी, इस्रायलच्या सैन्यदलाची कबुली - देश आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी जबाबदार

Israel Palestine Conflict : इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा आज सातवा दिवस आहे. यादरम्यान आज पहिल्यांदाच इस्रायली सैन्यदलानं हल्ला होण्यापूर्वी अलर्ट मिळविण्यात चूक झाल्याचं मान्य केलं.

Israel Palestine Conflict
Israel Palestine Conflict
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 11:08 AM IST

Updated : Oct 13, 2023, 1:05 PM IST

तेल अवीव Israel Palestine Conflict : 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर मोठ्या प्रमाणावर हल्ला केला आणि मोठ्या प्रमाणात लोक मारले गेले. यादरम्यान ते इस्रायलमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाले. 7 ऑक्टोबरला हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील मृतांची संख्या 1,300 वर पोहोचलीय तर सुमारे 3,300 लोक जखमी झाल्याची माहिती इस्रायलच्या माध्यमांनी दिलीय.

सैन्यदल प्रमुखांची कबुली : आयडीएफचे प्रमुख हर्झी हेलेवी यांनी काल दक्षिण इस्रायलमध्ये सांगितलं की, आयडीएफ देश आणि नागरिकांच्या सुरक्षेची त्यांच्यावर जबाबदारी आहे. आम्ही शनिवारी सकाळी गाझा पट्टीच्या आसपासचा भाग हाताळण्यात अयशस्वी ठरलो. आम्ही यातून शिकू, तपास करू. परंतु आता युद्धाची वेळ आलीय. आयडीएफ हमासच्या दहशतवाद्यांशी लढत असून त्यांची संपूर्ण यंत्रणा नष्ट करेल, असंही आयडीएफचे प्रमुख हर्झी हेलेवी यांनी सांगितलंय. एका प्राणघातक, क्रूर आणि धक्कादायक घटनेनंतर हमासच्या दहशतवाद्यांनी आमच्या मुलांची, आमच्या महिला आणि आमच्या लोकांची केलेली क्रूर कत्तल अमानवी आहे. आयडीएफ या निर्दयी दहशतवाद्यांशी लढत आहे. गाझा पट्टीचे शासक याह्या सिनवार यांनी या भयानक हल्ल्याचा निर्णय घेतला. त्यामुळं तो आणि त्याच्या हाताखालील संपूर्ण यंत्रणा नेस्तनाबूत करू. आम्ही त्यांच्यावर हल्ला करू. आम्ही त्यांना नष्ट करू, त्यांची व्यवस्था नष्ट करू, असं यावेळी आयडीएफच्या प्रमुखांनी सांगितलंय.

गाझाला गर्भित इशारा : आयडीएफचे प्रमुख हर्झी हेलेवी म्हणाले की, हमासनं हा हल्ला कसा केला याचा तपास करण्याची वेळ येईल. आम्ही ओलिसांना मायदेशी आणण्यासाठी सर्व काही करू, असंही आयडीएफ प्रमुख म्हणाले. तसंच आम्ही अनेक दहशतवादी, अनेक कमांडर मारत आहोत. या भयंकर, क्रूर गुन्ह्याचं समर्थन करणाऱ्या दहशतवाद्यांचं पूर्णपणे उच्चाटन करु. तसंच गाझा आता पूर्वीसारखा दिसणार नाही, असा इशारा आयडीएफ प्रमुखांनी दिलाय.

हेही वाचा :

  1. US Secretary Visit Israel : युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री तीन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर
  2. Israel Palestine Conflict : हजारोंचा बळी गेल्यानं संयुक्त राष्ट्रसंघाला चिंता, इस्राईल-हमास युद्ध थांबविण्याचं केलं आवाहन
  3. Israel Hamas Conflict : हमासला काय हवंय? अनेक वर्षांपासून इस्त्रायलबरोबर आहे संघर्ष

Last Updated : Oct 13, 2023, 1:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.