ETV Bharat / international

smuggling puppies and cat : मलेशियातून मांजराची तस्करी केल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या नागरिकाला शिक्षा - तुआस चेकपॉईंट

परवान्याशिवाय पाळीव प्राणी आयात केल्याबद्दल एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने 18 ऑक्टोबर 2022 रोजी मलेशियामधून एका ट्रकमधून 26 पिल्ले आणि एका मांजरीची तस्करी केली होती.

भारतीय वंशाच्या नागरिकाला अटक
भारतीय वंशाच्या नागरिकाला अटक
author img

By

Published : Apr 25, 2023, 2:20 PM IST

सिंगापूर : मलेशियाहून सिंगापूरला लाँड्री बॅगमध्ये 26 पिल्ले आणि एका मांजरीची तस्करी केल्याप्रकरणी 36 वर्षीय भारतीय वंशाच्या मलेशियातील नागरिकाला 12 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्थानिक माध्यमातून याप्रमाणे बातमी आलेली आहे. आजपर्यंतच्या प्राण्यांच्या तस्करीच्या सर्वात गंभीर प्रकरणांपैकी हे एक आहे, असे या प्रकरणाचे वर्णन करण्यात येत आहे. नॅशनल पार्क बोर्ड (NParks) ने ही माहिती दिली आहे. यामध्ये एक पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. कॅनाइन पार्व्होव्हायरस या विषाणूच्या संसर्गामुळे हे पिलू मरण पावले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोपी गोबीसुवरन परमन सिवन याने परवान्याशिवाय पाळीव प्राणी बेकायदेशीरपणे आयात करण्याचा उद्योग चालवला होता. त्याबद्दल आणि या प्रक्रियेत प्राण्यांना अनावश्यक वेदना आणि त्रास दिल्याबद्दल त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्याने 18 ऑक्टोबर 2022 रोजी मलेशियामधून एका ट्रकमध्ये 26 पिल्ले आणि एका मांजरीची तस्करी केली होती.

दक्षिणी द्वीपकल्प मलेशियाशी जोडलेल्या पुलाच्या सिंगापूर बाजूला तुआस चेकपॉईंट येथील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी आरोपी गोबीसुवरन याला हटकले. त्याची मलेशियन नोंदणीकृत गाडी अधिकाऱ्यांनी थांबवली आणि लॉरीच्या विविध कंपार्टमेंटमध्ये लपवलेले 27 पाळीव प्राणी त्यांना सापडले. एनपार्क्सच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांना काही प्राणी लाँड्री बॅगमध्ये बंदिस्त लपवून वाहनाच्या ओव्हरहेड कंपार्टमेंटमध्ये ठेवलेले आढळले.

प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या सीटच्या मागे इतर प्राणी ठेवण्यात आले होते, असे पोलिसांनी स्पष्ट केले. जर ही पिल्ले विकली गेली असती, तर कॅनाइन पार्व्होव्हायरस इतर कुत्र्यांमध्ये पसरला असता, असे NParks ने म्हटले आहे. कॅनाइन पार्व्होव्हायरस हे प्रौढ तसेच लसीकरण न केलेल्या कुत्र्यांमध्ये तीव्र, संसर्गजन्य गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजाराचे एक अत्यंत संसर्गजन्य घातक कारण आहे. NParks आणि इतर एजन्सींना ऑक्टोबर 2022 ते मार्च 2023 दरम्यान प्राण्यांच्या तस्करीची 19 प्रकरणे आढळून आली आहेत. अशा प्रकारच्या तस्करीमुळे भारताची मात्र नाहक बदनामी झाली आहे.

हेही वाचा - Mr Andhra in robbery cases : बॉडी बिल्डर आंध्र श्री निघाला अट्टल चोर, 32 दरोड्यातील मुख्य सय्यद बाशाच्या मुसक्या बंगळुरू पोलिसांनी आवळल्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.