कोलंबो: गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेला भारताने 44,000 टनांहून अधिक युरिया (44,000 metric tonnes of urea ) प्रदान केला आहे. येथील भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले की, श्रीलंकेच्या शेतकऱ्यांना मदत आणि अन्न सुरक्षा यांसाठी द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही मदत देण्यात आली आहे. श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त गोपाल बागले यांनी कृषी मंत्री महिंदा अमरवीरा ( Agriculture Minister Mahinda Amarveera ) यांची भेट घेतली आणि त्यांना 44,000 टनांहून अधिक युरियाची आवक झाल्याची माहिती दिली.
भारतीय उच्चायुक्तांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'उच्चायुक्तांनी श्रीलंकेच्या कृषीमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना भारताने श्रीलंकेला दिलेल्या कर्जाच्या रेषेअंतर्गत 44,000 टनांहून अधिक युरियाचा पुरवठा केला.'
भारताकडून मिळालेली ही मदत शेतकऱ्यांसह श्रीलंकेतील लोकांना पाठिंबा देण्यासाठी आणि देशातील नागरिकांच्या अन्न सुरक्षेसाठी प्रयत्नांना चालना देण्याच्या निरंतर वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
हेही वाचा - श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे 13 जुलै रोजी देणार राजीनामा : संसद अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने