ETV Bharat / international

Gaza West Bank Relation : युद्धात वारंवार उल्लेख होणाऱ्या गाझा, वेस्ट बँक आणि पॅलेस्टाईन यांच्यात संबंध काय, जाणून घ्या

Gaza West Bank Relation : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात वेस्ट बँक, गाझा आणि पॅलेस्टाईन या प्रदेशांचा वारंवार उल्लेख होते. मात्र त्यांचे परस्पर संबंध काय आहेत आणि कोणत्या भागांवर कोणाचं नियंत्रण आहे? जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी...

Gaza West Bank Relation
Gaza West Bank Relation
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 10:12 PM IST

नवी दिल्ली Gaza West Bank Relation : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाची तीव्रता वाढत आहे. इस्रायलच्या हल्ल्यापुढे हमास झुकायला तयार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमासला विश्वास आहे की या युद्धात त्याला अधिक पाठिंबा मिळेल. यासह तो गाझा तसेच वेस्ट बँकवरही आपला हक्क सांगू शकतो. मात्र युद्ध झाल्यानंतर नेहमी चर्चेत येणारे हे गाझा आणि वेस्ट बॅंक प्रदेश नेमके आहेत तरी काय. समजून घेऊया सोप्या भाषेत.

पॅलेस्टाईनची दोन भागात विभागणी : वास्तविक, आपण ज्या पॅलेस्टाईनबद्दल बोलतो तो दोन भागात विभागला आहे. एका भागाचं नाव गाझा असून दुसऱ्या भागाचं नाव वेस्ट बँक आहे. भौगोलिकदृष्ट्या हे दोन्ही क्षेत्र भिन्न आहेत. यांना आपण पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान (आजचा बांगलादेश) यांच्याप्रमाणे म्हणू शकतो. या दोघांचा मिळून पॅलेस्टाईन बनतो. हे दोन्ही क्षेत्र वेगवेगळ्या गटांच्या ताब्यात आहेत. गाझावर हमासचं नियंत्रण आहे, तर वेस्ट बँकवर पीएलओचं नियंत्रण आहे.

Gaza West Bank Relation
इस्रायल, गाझा आणि वेस्ट बँक

हमास आणि पीएलओ : पीएलओ ही अनेक छोट्या पक्षांची युती आहे. हा एक राजकीय पक्ष आहे, तर हमास ही एक अतिरेकी संघटना आहे. यांच्या कामाच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. हमासचा हिंसाचारावर विश्वास आहे, तर पीएलओचा विश्वास संवादाच्या आधारे समस्या सोडवण्यावर आहे. पीएलओ वेस्ट बँकेमध्ये सत्तेत आहे. फतह हा पीएलओचा सर्वात मोठा गट. जागतिक स्तरावर पॅलेस्टिनी लोकांचे प्रतिनिधी म्हणून पीएलओची ओळख आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा पॅलेस्टिनींच्या हक्कांची चर्चा होते तेव्हा त्यांच्या बाजूनं फक्त पीएलओ बोलतो. सध्या त्यांचं नेतृत्व महमूद अब्बास यांच्याकडे आहे.

Gaza West Bank Relation
इस्रायलचा वर्तमान नकाशा

गाझाच्या सीमा : या नकाशात तुम्ही गाझाचं संपूर्ण क्षेत्र किती मोठं आहे ते पाहू शकता. दक्षिणेला राफा बॉर्डर आहे. ही सीमा इजिप्तला मिळते. येथे मोठ्या संख्येने निर्वासित आले आहेत. उत्तरेकडील सर्वात महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे गाझा सिटी. हमासचे बहुतांश लढवय्ये याच भागात आहेत. सध्या इस्रायलचं लक्ष केवळ याच क्षेत्रावर आहे. इस्रायल या भागात कधीही आपलं ग्राउंड ऑपरेशन सुरू करू शकतो.

Gaza West Bank Relation
या नकाशात तुम्ही गाझा क्षेत्र पाहू शकता (गुलाबी रंग)

काय आहे इतिहास : ज्यू लोकांचा इस्रायल आणि मुसलमानांचा पॅलेस्टाईन १९४८ मध्ये स्वतंत्र प्रदेश म्हणून अस्तित्वात आले. त्यानंतर अरब देशांनी इस्रायलवर हल्ला केला. इस्रायलनं युद्धात त्यांंना चांगलाच धडा शिकवला. मात्र, इजिप्तनं गाझा ताब्यात घेतला. १९६६ पर्यंत गाझा इजिप्तच्या ताब्यात होता. १९६६ मध्ये पुन्हा एकदा अरब देश आणि इस्रायलमध्ये युद्ध झाले. यावेळीही विजय इस्रायलचाच झाला. यावेळी इस्रायलनं गाझा ताब्यात घेतला.

ओस्लो करार : १९९३ मध्ये एक करार झाला. ओस्लो करार असं त्याचं नाव. या करारानुसार इस्रायलनं गाझाचा प्रदेश रिकामा करण्यास सुरुवात केली. या करारात गाझा आणि वेस्ट बँकचं क्षेत्र पॅलेस्टिनी लोकांच्या मालकीचं असेल, तर उर्वरित क्षेत्र इस्रायलचं असेल, असं म्हटलं होतं. हमासनं मात्र या कराराला विरोध केला. ओस्लो करारानुसार इस्रायलनं २००५ पर्यंत गाझा रिकामा केला. यानंतर २००६ मध्ये पॅलेस्टाईनमध्ये निवडणुका झाल्या. हमासनं या निवडणुकात आश्चर्यकारकपणे विजय मिळवला. या निवडणुकीनंतर हमास आणि फतह यांच्यात तणाव निर्माण झाला. फतह आपला पराभव स्वीकारायला तयार नव्हते. हमासनं गाझा ताब्यात घेतला, तर पीएलओनं वेस्ट बँक ताब्यात घेतला. तेव्हापासून हे दोन्ही क्षेत्र त्यांच्याच ताब्यात आहेत. गाझामध्ये २००६ पासून कोणतीही निवडणूक झालेली नाही.

गाझाचं क्षेत्रफळ किती आहे : गाझा पट्टी ४५ किलोमीटर लांब आणि ६-१२ किलोमीटर रुंद आहे. त्याचं एकूण क्षेत्रफळ ३६५ चौरस किमी आहे. मात्र या इवल्याश्या चिंचोळ्या पट्टीत तब्बल २३ लाख लोकं राहतात. गाझामध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता आहे. येथील ६० टक्के लोकसंख्या १९ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. गाझाच्या पश्चिमेला समुद्र, तर दक्षिणेला इजिप्त आहे. गाझाला इस्रायलनं इतर दोन बाजूंनी घेरलंय.

हेही वाचा :

  1. Israel Hamas War : भारताकडून पॅलेस्टाईनला मदतीचा हात, हवाई दलाचं विमान मदत साहित्य घेऊन रवाना
  2. Israel Hamas Conflict : हमासचा अचानक हल्ला इस्रायली गुप्तचर यंत्रणेचं अपयश, कसा झाला ५० वर्षांतील सर्वात मोठा हल्ला?
  3. Israel Hamas Conflict : इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या नेतृत्वाला धोका?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.