ETV Bharat / international

G20 Foreign Ministers Meeting : इंडोनेशियाच्या बालीमध्ये आज जी २० देशांच्या विदेशमंत्र्यांची बैठक.. 'या' विषयावर होणार चर्चा - बाली जी20 बैठक आज

इंडोनेशियातील बाली येथे आज G-20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार ( g20 foreign ministers meeting today bali ) आहे. या बैठकीत युक्रेन संकटावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

G20 Foreign Ministers MEETING
इंडोनेशियाच्या बालीमध्ये आज जी २० देशांच्या विदेशमंत्र्यांची बैठक
author img

By

Published : Jul 8, 2022, 11:58 AM IST

जकार्ता ( इंडोनेशिया ) : जगातील श्रीमंत आणि विकसनशील देशांचा समूह असलेल्या G-20 देशांचे परराष्ट्र मंत्री इंडोनेशियातील बाली येथे एक दिवसीय चर्चेसाठी एकत्र येत ( g20 foreign ministers meeting today bali ) आहेत. चर्चेचा अजेंडा जागतिक सहकार्य, अन्न आणि ऊर्जा सुरक्षेला चालना देणे हा आहे. परंतु या बैठकीत युक्रेनच्या युद्धाचा मुद्दाही गाजण्याची शक्यता आहे.

धडा शिकविण्याचा प्रयत्न : बाली येथे त्यांच्या आगमनापूर्वी, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी अनेक आशियाई देशांना भेटी दिल्या आहेत. ज्याचा उद्देश चर्चेच्या आधी पाठिंबा मिळवणे आणि या प्रदेशातील त्यांचे संबंध मजबूत करणे आहे. दुसरीकडे, अमेरिका आणि त्याचे मित्र राष्ट्र रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना नोव्हेंबरमध्ये बाली येथे होणाऱ्या G20 परिषदेवर बहिष्कार टाकण्याची धमकी देण्यासह अनेक मार्गांनी धडा शिकविण्याचा प्रयत्न करत आहेत.

इंडोनेशिया तटस्थ भूमिकेत : यावर्षी, G20 शिखर परिषदेचे अध्यक्ष असलेल्या इंडोनेशियाकडे जागतिक स्तरावर अधिक रचनात्मक भूमिका बजावण्याची तसेच शिखर परिषदेचे आयोजक म्हणून जबाबदारी आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी इंडोनेशियाने तटस्थ भूमिका स्वीकारली असून, राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनीही या प्रकरणी आपली भूमिका कायम ठेवली आहे. युक्रेन G20 गटाचा भाग नाही, परंतु विडोडोने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले आहे.

पुतीन येणार की नाही : मात्र, युद्ध सुरूच राहिल्यास ते परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. ते व्हिडिओ लिंकद्वारे चर्चेवर लक्ष ठेवतील, असे झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे. असे सांगण्यात येत आहे की जर्मनीतील जी-7 शिखर परिषदेच्या वेळी विडोडो यांनी इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांना सांगितले होते की, जी-20 शिखर परिषदेत पुतिन देखील सहभागी होणार नाहीत. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे रशियाकडून सांगण्यात आले आहे. गुरुवारी अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियनचे परराष्ट्र मंत्री बालीमध्ये दाखल झाले आहेत.

हेही वाचा : G20 summit in 2023 : जम्मू-काश्मीरमध्ये जी-20 बैठक घेण्याच्या योजनेवर चीनने घेतला आक्षेप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.