ETV Bharat / international

Shinzo Abe : जपानचे माजी पंतप्रधान आबे यांचा गोळीबारात मृत्यू

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर भाषणादरम्यान गोळी झाडण्यात आली ( Shinzo Abe has been shot ). त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरक्षा यंत्रणेने संशयित हल्लेखोराला अटक केली आहे.

Shinzo Abe
शिंजो आबे Shinzo Abe
author img

By

Published : Jul 8, 2022, 9:43 AM IST

Updated : Jul 8, 2022, 2:38 PM IST

टोकियो ( जपान ) : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळ्या झाडण्यात ( Shinzo Abe has been shot ) आल्या. शिंजो आबे यांच्या छातीत गोळी लागली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने सध्या आबे यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यांन त्यांचा मृत्यू झाला. पोलीस यंत्रणेने संशयित हल्लेखोराला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे.

  • Officials say former Japanese Prime Minister #ShinzoAbe has been confirmed dead. He was reportedly shot during a speech on Friday in the city of Nara, near Kyoto: Japan's NHK WORLD News pic.twitter.com/7ayJpNCw17

    — ANI (@ANI) July 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जपानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीची ओळख करण्यात आली आहे. त्याचे वय ४१ आहे. गोळीबाराचे कारण समजू शकले नाही. माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर हल्ला हा नारा शहरात झाला. घटनेच्या वेळी ते भाषण करत होते. गोळी लागल्यावर आबे खाली पडले. त्यांच्या शरीरातूनही रक्त येत होते. शिंजो आबे अचानक पडल्यामुळे तिथे उपस्थित लोकांना काहीच समजले नाही. मात्र, यादरम्यान काही लोकांनी तेथे गोळीबार केल्यासारखे काहीसे आवाज ऐकू आले. सध्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

हल्ल्यानंतरचे काही व्हिडिओ फुटेज समोर आले आहेत. यामध्ये चेंगराचेंगरीची परिस्थिती तेथे पाहायला मिळते. माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी 2020 मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. ते बरेच दिवस आजारी होते. शिंजो आबे यांचा जन्म टोकियो येथे राजकीयदृष्ट्या प्रमुख कुटुंबात झाला. त्याचे कुटुंब मूळचे यामागुची प्रीफेक्चरचे आहे. शिंजो आबे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत.

हेही वाचा : जपानचे मावळते पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी मोदींची फोनवर चर्चा, म्हणाले...

Last Updated : Jul 8, 2022, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.