ETV Bharat / international

Donald Trump Twitter : ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु करायचे का? मस्क यांनी विचारला पोलद्वारे युजर्सला प्रश्न - माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे ट्विटर खाते

मस्क यांच्या या पोलला एका तासात सुमारे 10 लाख मते मिळत आहेत. (Elon Musk twitter poll about Donald Trump). यापूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर कॅपिटल हिल येथे 6 जानेवारी 2021ला झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे खाते निलंबित करण्यात आले होते.

Donald Trump Twitterat
Donald Trump Twitter
author img

By

Published : Nov 19, 2022, 5:57 PM IST

वॉशिंग्टन - ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटच्या वापरकर्त्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे खाते पुन्हा सक्रिय करायचे की नाही यावर मतदान करण्यास सांगितले आहे. (Elon Musk twitter poll) जानेवारी 2021 मधील कॅपिटल हिल वर झालेल्या दंगली नंतर ट्रम्प यांच्यावर ट्विटरने आजीवन बंदी घातली होती.

  • Reinstate former President Trump

    — Elon Musk (@elonmusk) November 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बंदी घालण्यात आलेली खाती सक्रिय करण्यास सुरुवात - मस्क यांनी ट्वीट केले आहे की, 'माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे ट्विटर खाते पुन्हा सक्रिय करा'. यावर होय किंवा नाही असे मत देण्याची संधी आहे. मस्क यांच्या या पोलला एका तासात सुमारे 10 लाख मते मिळत आहेत. यापूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर कॅपिटल हिल येथे 6 जानेवारी 2021ला झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे खाते निलंबित करण्यात आले होते. इलॉन मस्क यांचे हे नवीन धोरण आश्चर्यकारक नाही. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्कने गेल्या काही दिवसात ट्विटरच्या बाबतीत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. शुक्रवारी, मस्कने प्लॅटफॉर्मचे नियम तोडल्याबद्दल पूर्वी अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आलेली खाती पुन्हा सक्रिय करण्यास सुरुवात केली आहे. लेखक जॉर्डन पीटरसन आणि कॉमेडियन कॅथी ग्रिफिन हे पहिले लोक होते ज्यांची खाती पुन्हा सक्रिय केली गेली.

#RIPTwitter हॅशटॅग ट्रेंडींग वर - दरम्यान, ट्रम्प यांच्या एकापाठोपाठ एक वादग्रस्त निर्णयानंतर ट्विटरवर #RIPTwitter हे हॅशटॅग शुक्रवारी टॉप ट्रेंड पैकी एक राहिले. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेण्यासाठी $44 अब्ज करार जाहीर केल्यापासून ते सतत वेगवेगळ्या वादात सापडले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.