ETV Bharat / international

PM Modi meets Jill biden: शिक्षण हा भारत आणि अमेरिका यांच्यातील सखोल संबंधांचा आधारस्तंभ: जिल बायडेन - पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा

अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बायडेन यांनी बुधवारी स्किलिंग फॉर फ्यूचर कार्यक्रमात सांगितले की, भारत आणि संयुक्त राष्ट्र अमेरिका यांच्यातील सखोल संबंध रुचवण्यासाठी शिक्षण हे आधारस्तंभ आहे. दोन्ही देशातील विद्यार्थ्यी एकमेकांसोबत शिक्षण घेत आहेत.

PM Modi meets Jill biden
पंतप्रधान मोदींनी जिल बिडेन यांची भेट घेतली
author img

By

Published : Jun 22, 2023, 10:31 AM IST

वॉशिंग्टन डी. सी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्राच्या प्रथम महिला जिल बायडेन यांनी बुधवारी नॅशनल सायन्स फाउंडेशनला भेट दिली. हे नॅशनल सायन्स फाउंडेशन व्हर्जिनियाच्या अलेक्झांड्रिया येथे आहे. नॅशनल सायन्स फाउंडेशनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्किलिंग फॉर द फ्युचर या कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी जिल बायडेन म्हणाल्या की, शिक्षण हा भारत आणि अमेरिका यांच्यातील सखोल संबंधांचा आधारस्तंभ आहे. दोन्ही देशांतील विद्यार्थी एकमेकांसोबत शिकत आहेत आणि प्रगती करत आहेत. आम्ही दररोज नवीन शोध लावत आहोत आणि एकत्रितपणे आम्ही एक चांगले जग तयार करत आहोत.

बायडेन शैक्षणिक धोरण : जिल बायडेन पुढे म्हणाल्या की, दोन्ही देशाच्या अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भारत आणि अमेरिकेला युवकांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे, ते आपल्या भविष्य आहेत. याचबरोबर त्यांनी तरुणांना संधी मिळाल्या पाहिजेत,यावरही त्यांनी प्रकाशझोत टाकला. NSF सारख्या एजन्सीसह आमचे संपूर्ण प्रशासन, नियोक्ते, संघटना, शाळा आणि स्थानिक सरकारे यांच्याशी भागीदारी करत आहोत. आम्ही विद्यार्थ्यांना करिअरसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची खात्री करण्यासाठी एकत्र येत आहोत. हेच बायडेन यांचे शैक्षणिक धोरण आहे

प्रतिभेच्या पाइपलाइनची गरज : अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन म्हणाल्या की, अनेक वर्षांचे संबंध दृढ झाल्यानंतर अमेरिका आणि भारताची भागीदारी अधिक घट्ट झाली आहे. आम्ही (भारत आणि अमेरिका) संयुक्तपणे जागतिक आव्हानांचा सामना करत आहोत. सर्व भारतीयांना विशेषतः मुलींना आवश्यक असलेले शिक्षण आणि कौशल्ये मिळण्याची संधी मिळावी यासाठी तुम्ही काम करत आहात. आमच्या शाळा आणि व्यवसाय येथील विद्यार्थ्यांसाठी काही नवीन उपक्रम चालू करत आहेत. यातील काही गोष्टी दाखवणे हे आमच्यासाठी आनंदी आहे. तत्पूर्वी कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील भागीदारी शाश्वत आणि सर्वसमावेशक जागतिक विकासामागील प्रमुख इंजिन म्हणून काम करेल. विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी भारत आणि अमेरिकेला प्रतिभेच्या पाइपलाइनची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. एका बाजुला अमेरिकेत उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्था आणि प्रगत तंत्रज्ञान आहे. तर दुसरीकडे, जगातील सर्वात मोठी तरुणांची फॅक्टरी भारतात आहे. त्यामुळेच भारत-अमेरिका भागीदारी शाश्वत आणि सर्वसमावेशक जागतिक विकासाचे इंजिन ठरेल असा माझा विश्वास आहे.

  • #WATCH | Prime Minister Narendra Modi and the First Lady of the United States, Jill Biden visited the National Science Foundation in Alexandria, Virginia earlier today as they highlighted the US and India's shared priority around education and workforce.

    Indian Ambassador to US… pic.twitter.com/EWWJz3KN7Q

    — ANI (@ANI) June 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -

  1. PM Modi USA Visit : व्हाईट् हाऊसमध्ये जो बायडेन अन् फस्ट लेडीने केले पंतप्रधान मोदींचे स्वागत
  2. PM Modi in USA : मोदींनी दिल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि यूएस फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना 'या' विशेष भेटवस्तू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.