अटलांटा : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी अटलांटा येथील फुल्टन काउंटी जेलमध्ये आत्मसमर्पण केले. ट्रम्प यांच्यावर, जॉर्जियाच्या २०२० निवडणुकीचे निकाल उलथवण्याच्या प्रयत्नांशी संबंधित सहाहून अधिक आरोप आहेत. आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना 2,00,000 डॉलर्सच्या बॉन्डवर सोडण्यात आले.
-
https://t.co/MlIKklPSJT pic.twitter.com/Mcbf2xozsY
— Donald J. Trump (@realDonaldTrump) August 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">https://t.co/MlIKklPSJT pic.twitter.com/Mcbf2xozsY
— Donald J. Trump (@realDonaldTrump) August 25, 2023https://t.co/MlIKklPSJT pic.twitter.com/Mcbf2xozsY
— Donald J. Trump (@realDonaldTrump) August 25, 2023
तुरुंगाबाहेर समर्थकांची गर्दी जमली होती : ट्रम्प यांच्या आत्मसमर्पणाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. ट्रम्प तुरुंगात पोहोचताच, त्यांचे समर्थक बॅनर आणि अमेरिकन झेंडे घेऊन त्यांची झलक पाहण्यासाठी उभे होते. बाहेर जमलेल्या ट्रम्प समर्थकांमध्ये जॉर्जियाचे यूएस प्रतिनिधी मार्जोरी टेलर ग्रीनही होते. ते ट्रम्प यांच्या सर्वात विश्वासू सहाय्यकांपैकी एक आहेत. आपण जॉर्जियामध्ये आत्मसमर्पण करणार असल्याचे ट्रम्प यांनी या आधीच आपल्या सोशल मीडियाद्वारे सांगितले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काय आरोप आहेत? : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 2020 निवडणुकीचे निकाल उलटवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी विशेष वकिलांनी 45 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. निवडणूक जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा खोटा असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. ट्रम्प यांना आपले दावे खोटे असल्याचे माहीत होते. तरीही त्यांनी जनतेला भडकावण्यासाठी आणि निवडणूक प्रशासनावरील जनतेचा विश्वास उडवण्यासाठी असे केले. डोनाल्ड ट्रम्प यांना कट रचून सत्तेत राहायचे होते, असे फेडरल वकिलांचे म्हणणे आहे.
ट्रम्प समर्थक काय म्हणतात? : ट्रम्प यांच्यावरील फौजदारी खटला अशा वेळी आला आहे, जेव्हा ते त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाची उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे ट्रम्प आणि समर्थकांचे म्हणणे आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या. निकालानंतर ट्रम्प यांनी पराभव स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर 6 जानेवारी 2021 रोजी राजधानी वॉशिग्टन डी.सी. मध्ये मोठा हिंसाचार झाला. ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊसमध्ये घुसून अधिकार्यांवर हल्ला केला. तसेच निवडणुकीची मोजणी विस्कळीत केली होती.
हेही वाचा :
- US President Race : भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींची लोकप्रियता वाढली, ट्रम्प यांच्यानंतर सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार ठरले
- Plane Crash In Russia : ब्लादिमीर पुतीन यांना जेरीस आणणाऱ्या प्रिगोझिन यांचं जेट विमान 'क्रॅश', अपघातात सगळे प्रवासी ठार झाल्याची भीती
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात संभाषण