ETV Bharat / international

Corona In China : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार..एका दिवसात तब्बल 3 कोटी पॉझिटिव्ह!

चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने (Corona In China) लोकांना रुग्णालयात खाटांसाठी संघर्ष करावा लागतो आहे. देशात सध्या औषधांचाही तुटवडा जाणवत आहे. विदेशी मीडियाच्या दाव्यानुसार, या आठवड्यात केवळ एका दिवसात बाधितांची संख्या 3 कोटी 70 लाखांवर पोहोचली आहे. (37 million covid cases in a day). वाचा संपूर्ण बातमी.. (Covid 19 in China).

Corona In China
Corona In China
author img

By

Published : Dec 24, 2022, 6:20 PM IST

बीजिंग : चीनमध्ये कोरोनाने कहर केला आहे. (Corona In China). हॉस्पिटलमध्ये लोकांना बेड मिळणे अशक्य झाले आहे. चीनच्या सर्वोच्च आरोग्य प्राधिकरणाने शुक्रवारी एक धक्कादायक माहिती दिली आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या उच्च आरोग्य प्राधिकरणाने भीती व्यक्त केली की या आठवड्यात एका दिवशी सुमारे 3 कोटी 70 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. (37 million covid cases in a day). हे आत्तापर्यंत जगात एका दिवसात आलेले कोरोनाचे सर्वात मोठे आकडे ठरू शकतात. (Covid 19 in China).

चीनच्या 18 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण : या आधी बुधवारी चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाची अंतर्गत बैठक झाली. या बैठकीनंतर माहिती समोर आली की डिसेंबरच्या पहिल्या 20 दिवसांत चीनच्या लोकसंख्येच्या 18 टक्के म्हणजेच 248 दशलक्ष लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कोरोनाबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये रुग्ण उपचारासाठी हैराण होण्यापासून ते उपचाराविना मृत्यू पावण्यापर्यंतचे चित्र दिसत आहेत.

चीन नाकारतो आहे कोवीडमुळे झालेले मृत्यू : मीडिया रिपोर्टनुसार, तेथील प्रशासनानेही चीनमध्ये अनियंत्रित झालेल्या कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकाराशी संबंधित वास्तव स्वीकारले आहे. या संदर्भात आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या महिन्याच्या अखेरीस संसर्गाची सध्या सुरू असलेली लाट कळस गाठेल. हे पाहता, बाधित रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. ही स्थिती पुढील महिन्याच्या सुरुवातीपर्यंत कायम राहू शकते. मात्र चीन अजूनही कोविडमुळे झालेल्या लोकांचा मृत्यू स्वीकारत नाही आहे. शुक्रवारीही कोविडमुळे कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचा सरकारचा दावा आहे.

चीनमध्ये मंदीचा धोका : चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी शिथिल केल्यानंतर कोरोना बाधितांची संख्या एकदम वाढली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे बहुतांश बाजारपेठा बंद आहेत, तर कारखान्यांमधील काम थांबले आहे किंवा त्यांचे उत्पादन कमी झाले आहे. इतर आर्थिक घडामोडीही ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे मालाची जागतिक पुरवठा व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनमध्ये मंदीचा धोका निर्माण झाला आहे. त्याचा गेल्या 50 वर्षांतील सर्वात कमी विकास दर होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे, तज्ज्ञांच्या भीतीनुसार, कोरोना संसर्गाची लाट एप्रिलपर्यंत कायम राहिल्यास जागतिक मंदीचा धोका निर्माण होऊ शकतो. कारण जगातील अनेक उपभोग्य वस्तू चीनने बनवल्या आहेत.

महिन्याच्या अखेरीस कोरोना संसर्गाच्या शिखरावर : चीनमधील नॅशनल सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजचे संचालक झांग वेनहॉन्ग यांनी शांघाय शहरातील डेझी हॉस्पिटलच्या मूल्यांकनानुसार या महिन्याच्या अखेरीस कोरोना संसर्गाच्या शिखरावर पोहोचण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जानेवारी 2023च्या सुरुवातीपासून चीनमध्ये कोविड बाधितांची संख्या कमी होऊ लागेल. यानंतर, दुसरी लाट पुन्हा येईल, ज्याचा प्रभाव सुमारे दोन महिने राहील.

आकड्यांमधील तफावत : त्यांनी सांगितले की शांघायमधील रुग्णालयांच्या भेटीदरम्यान त्यांना आढळले की दाखल झालेल्या रुग्णांमध्ये गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. तर एअरफिनिटी या यूकेच्या आरोग्य डेटाचे विश्लेषण करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे की सध्या चीनमध्ये दररोज दहा लाखाहून अधिक संक्रमित आढळून येत आहेत आणि मृतांची संख्या पाच हजारांहून अधिक आहे. तर अमेरिकन वृत्तसंस्था ब्लूमबर्गने दावा केला आहे की चीनमध्ये दररोज सुमारे चार कोटी संक्रमित आढळत आहेत. चीन सरकारची अधिकृत माहिती आणि पाश्चिमात्य देशांच्या संस्थांचे दावे यात मोठी तफावत असल्याचे यावरून सिद्ध होते.

चीनमध्ये औषधांचा मोठा तुटवडा : चीनमध्ये औषधांचा मोठा तुटवडा आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी औषध कंपन्यांमध्ये ओव्हरटाईम केला जात आहे. दरम्यान, चीन सरकारने ताप, अंगदुखी आणि डोकेदुखीवर मोफत औषधे देण्याची घोषणा केली आहे. देशभरातील मेडिकल स्टोअर्समध्ये N-95 मास्क आणि अँटीजेन टेस्टिंग किट संपले आहेत. मागणी पाहून जिनपिंग सरकारने 100 हून अधिक नवीन कंपन्यांना परवाने दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.