ETV Bharat / international

पुतीन यांच्या इशाऱ्यानंतरही ब्रिटनकडून युक्रेनला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र यंत्रणा देण्याची घोषणा

अमेरिकेपाठोपाठ आता ब्रिटनने रशियाशी युद्ध करण्यासाठी युक्रेनला शस्त्रास्त्रांची मदत देण्याची घोषणा केली आहे. युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र यंत्रणा देण्यात येणार असल्याची घोषणा ब्रिटनचे संरक्षण सचिव बेन वॉलेस यांनी रविवारी (दि. 5 जून) उशिरा केली. पाश्चिमात्य देशांकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा केल्यानंतर युक्रेनवरचा हल्ला अधिक तीव्र करू, असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिल्यानंतर लगेचच ब्रिटनने लष्करी मदतीची घोषणा केली.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jun 6, 2022, 5:42 PM IST

लंडन - रशियाशी युद्ध करणाऱ्या युक्रेनला अमेरिकेपाठोपाठ ब्रिटननेही लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र देण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनचे संरक्षण सचिव बेन वॉलेस यांनी रविवारी (दि. 5 जून) रात्री उशिरा ही घोषणा केली आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या धमक्यांना न जुमानता ब्रिटनने आपले लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र युक्रेनला पाठवेल, असे निवेदन ब्रिटिश संरक्षण सचिवांनी जारी केले आहे.

'रशियाची रणनीती बदलत असताना युक्रेनला आमचा पाठिंबा कायम राहील. बिट्रेनच्या बहुविध प्रक्षेपक रॉकेट यंत्रणेमुळे रशियाकडून करण्यात येत असलेल्या लाँग रेंज आर्टिलरीच्या फटक्यांपासून युक्रेनचे संरक्षण होऊ शकणार असून पुतिन यांच्या लष्कराने त्याचा अंदाधुंद वापर केला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना बेन वॉलेस म्हणाले की, रशियाच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ब्रिटनने युक्रेनला शस्त्रास्त्र देण्याचा निर्णय घेतला आहे, जे आजच्या काळात आवश्यक आहे.

स्वसंरक्षणासाठी वापर करू शकतो क्षेपणास्त्र - ब्रिटनच्या मल्टिपल लाँच रॉकेट यंत्रणेमुळे एका मिनिटात जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या 12 क्षेपणास्त्रांचा मारा होऊ शकतो. हे 80 किलोमीटरच्या रेंजमध्ये अचूकतेने लक्ष्यावर हल्ला करू शकते. हे एम 142 हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टम (HIMARS) सारखेच आहे, जे अमेरिकेने युक्रेनला पाठविले आहे. अहवालानुसार, रशियातील हल्ल्यांसाठी मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टिमचा वापर होणार नाही, याची हमी युक्रेन जेव्हा देईल, तेव्हा त्याला ही शस्त्रे दिली जातील. युक्रेनला या शस्त्रांचा वापर स्वत:च्या संरक्षणासाठी करू शकतो.

पाश्चिमात्य देशांनी कीव्हला लांब पल्ल्याची शस्त्रे पाठवल्यास रशिया युक्रेनवर हल्ला करेल, असा इशारा पुतीन यांनी दिला आहे. रशिया-1 या सरकारी माध्यमांना रविवारी (दि. 5 जून) दिलेल्या मुलाखतीत व्लादिमीर पुतीन म्हणाले की, पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला हाताशी धरण्यामागे एकच उद्देश आहे की, ही लढाई शक्य तितकी लांबवणे. युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा असाच सुरू राहिला तर रशिया युक्रेनच्या उर्वरीत भागावरही हल्ला करेल, असा इशारा रशियाच्या अध्यक्षांनी पुन्हा एकदा दिला आहे. युक्रेनच्या सैन्यात आधीच सोव्हिएत आणि रशियन बनावटीच्या ग्रॅड, स्मेर्च आणि उरगान यंत्रणा आहेत. एका वृत्तानुसार, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी रविवारी इशारा दिल्यानंतर रशियन सैन्यांनी युक्रेनच्या काही भागात हल्ले केले. युक्रेनच्या पूर्व डोनबास भागातील प्रमुख शहरांच्या नियंत्रणासाठी जोरदार लढा सुरू आहे.

हेही वाचा - चीनला रोखण्यासाठी भारताची नवी चाल.. व्हिएतनामला 'ब्रम्होस'नंतर विकणार 'हे' सुपरसॉनिक क्षेपणास्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.