ETV Bharat / international

Turkey Earthquake Today : भूकंपाच्या आणखी एका धक्क्याने हादरले तुर्की, मदत आणि बचावकार्य जारी - भूकंप

आज सकाळी 8.30 च्या दरम्यान तुर्कीला भूकंपाचा आणखी एक धक्का बसला. काल आलेल्या भूकंपात आत्तापर्यंत 4000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून सुमारे 15000 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

Turkey Earthquake
तुर्की भूकंप
author img

By

Published : Feb 7, 2023, 10:58 AM IST

Updated : Feb 7, 2023, 11:32 AM IST

अंकारा (तुर्की) : सोमवारी पहाटे ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसल्यानंतर तुर्की आज पुन्हा भूकंपाने हादरला आहे. गेल्या दोन दिवसांतील भूकंपाचा हा चौथा धक्का आहे. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 5.6 अशी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे आफ्टरशॉक्स दक्षिण तुर्कीमध्ये सीरियाच्या सीमेपासून मालत्या प्रांतापर्यंत 300 किलोमीटर पेक्षा जास्त पसरले आहेत.

जगभरातून मदत : भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, दोन भारतीय आपत्ती निवारण पथकांपैकी पहिली तुकडी सोमवारी रात्री तुर्कीला रवाना झाली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी रात्री ट्विट करून शोक व्यक्त केला. त्यांनी सीरियाचे परराष्ट्रमंत्री फैसल मेकदाद यांच्याशी संपर्क साधत आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सोमवारी इराकचे पंतप्रधान मोहम्मद एस. अल-सुदानी यांनी घोषणा केली की, ते आपत्कालीन वैद्यकीय पुरवठा, प्रथमोपचार आणि निवारा पुरवठा तसेच औषध आणि इंधन पाठवतील. तसेच इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांनीही आपत्तीग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. जपानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या निवेदनानुसार, तुर्कीमधील भूकंपाला प्रतिसाद म्हणून जपानने देशाच्या आपत्ती निवारण बचाव पथकाला पाठवले आहे. नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कीला अमेरिकेने देखील मदत जाहीर केली आहे. व्हाईट हाऊसने सांगितले की ते तुर्कीमध्ये मदत कार्यासाठी शोध आणि बचाव पथके पाठवत आहेत.

या आधीही आला होता भूकंप : हा प्रदेश भूकंपप्रवण असून येथे वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात. 1999 मध्ये उत्तर-पश्चिम तुर्कीला आलेल्या अशाच शक्तिशाली भूकंपात सुमारे 18,000 लोक मारले गेले होते. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाने सोमवारच्या भूकंपाची तीव्रता 7.8 मोजली आहे. भूकंपाचे उगमस्थान जमिनीखाली सुमारे 18 किलोमीटर अंतरावर आहे. भूकंपामुळे एकट्या तुर्कीत ५,६०० हून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. इस्केन्डरून या शहरात रुग्णालयांचे नुकसान झाले असून आणि एक रुग्णालय कोसळले आहे.

7,800 हून अधिक लोकांना वाचवले : बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या एन्क्लेव्हमध्ये शेकडो कुटुंबे ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. या क्षेत्रात युद्धामुळे देशाच्या इतर भागांतून विस्थापित झालेल्या सुमारे 4 दशलक्ष लोक राहतात. तसेच तुर्की हे आजूबाजूच्या देशांतील गृहयुद्धामुळे निर्वासित झालेल्या लाखो लोकांचे घर आहे. यातील अनेक निर्वासित पूर्वीच्या बॉम्बस्फोटांमुळे उद्ध्वस्त झालेल्या इमारतींमध्ये राहतात. तुर्कीच्या 10 प्रांतांमध्ये सुमारे 7,800 हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे.

हेही वाचा : India Help Turkey : भूकंपाने संकटात सापडलेल्या तुर्कीला भारताचा मदतीचा हात, विमानाने साहित्य रवाना

Last Updated : Feb 7, 2023, 11:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.