ETV Bharat / international

Afghanistan Earthquake : शक्तिशाली भूकंपानं अफगाणिस्तानमध्ये त्राहीमाम; 30 मिनिटांत 4 धक्के, 2000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू - Afghanistan rises to two thousands

Afghanistan Earthquake : स्थानिक मिडीयानं दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानमध्ये शक्तिशाली भूकंप झाला असून मृतांची संख्या 2000 च्या पुढं गेली आहे. यामुळं शेकडो नागरिक बेघर झाले आहेत.

Afghanistan Earthquake
Afghanistan Earthquake
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 6:06 PM IST

Updated : Oct 8, 2023, 7:11 PM IST

काबूल Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात तब्बल 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप आलाय. या प्रलयकारी भूकंपामुळं अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. अफगाणिस्तानातील स्थानिक मिडीयानं दिलेल्या वृत्तानुसार, या भूकंपामुळं आतापर्यंत सुमारे 2000 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. तर हजारो नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, यानंतर शोध आणि बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

2000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू : यासंदर्भात तालिबानी प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या पश्चिमी भागात शक्तीशाली भूकंप झालाय. या भूकंपात 2000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. तसंच या भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. पश्चिम अफगाणिस्तानात ईराणच्या सीमेजवळ देखील भूकंपाचे हादरे जाणवल्याच समोर आलंय. या भूकंपामुळं हेरात शहरापासून जवळपास 40 किमी दूर असलेली अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत. तसंच अनेक इमारती कोलमडून जमिनदोस्त झाल्या आहेत. यामुळं शेकडो नागरिक मलब्याखाली अडकली आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे जवळपास तीन धक्के जाणवले होते. यामुळं पहिल्या कार्यालयातील इमारती हालत असल्याचं जाणवलं त्यानंतर काहीच वेळात या इमारती जमीनदोस्त झाल्याचा अनूभव या विनाशकारी भूकंपातून वाचलेल्या लोकांनी सांगितलय.

सहा गावं पुर्णपणे नष्ट : अफगाणिस्तानच्या सूचना व सांस्कृतिक मंत्रालयातील प्रवक्ता अब्दुल रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेरातमध्ये भूकंपात जीव गेलेल्या नागिरकांची संख्या मुळ आकड्यापेक्षा अधिक आहे. त्यांना तात्काळ मदतीची गरज असून या भूकंपात सहा गावं पूर्णपणे नष्ट झाली आहेत. शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. स्थानिक मिडीयानं दिलेल्या वृत्तानुसार या भुकंपात आतापर्यंत सुमारे 465 घरं नष्ट झाली असून 135 घरांचे नुकसान झालंय.

भूकंपाचा केंद्रबिंदू कुठं : अफगाणिस्तानातील आपत्ती प्राधिकरणाचे प्रवक्ता मोहम्मद अब्दुल्ला जान यांनी सांगितलं की, हेरात प्रांतातील जेंडा जान जिल्ह्यातील चार गावात भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. यानंतर सलग तीन वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्यानं यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनं या भूकंपाचा केंद्रबिंदू हेरात शहराच्या वायव्येस सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असल्याचं नोंदवलंय. यानंतर सलग तीनवेळी जाणवलेल्या भूकंपाची तिव्रता 6.3, 5.9 आणि 5.5 इतकी होती.

हेही वाचा :

  1. Afghanistan Earthquake : भूकंपाच्या धक्क्यानं अफगाणिस्तान हादरलं; 320 नागरिकांचा मृत्यू
  2. Israel Hamas Conflict :इस्रायल-हमास संघर्षाबाबत आज UNSC बैठक, भारत अमेरिकेकडून निषेध
  3. Israel Hamas Conflict : हमासच्या रॉकेट हल्ल्याला इस्रायलचं प्रत्युत्तर, 230 हून अधिक पॅलेस्टिनी ठार

Last Updated : Oct 8, 2023, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.