मुरघोब ( ताजिकिस्तान ) : ताजिकिस्तानमध्ये गुरुवारी 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. गुरूवारी पावणे एकच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. ताजिकिस्तानमधील मुरघोबपासून 67 किमी पश्चिमेला हा भूकंप आला होता. 20.5 किमी खोलीवर हा भूकंप जाणवला. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
तुर्कीमध्ये भूकंप : दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या भीषण भूकंपातून तुर्की अजूनही सावरला नसताना 21 तारखेला पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. तुर्कीच्या दक्षिणी हते प्रांतात हा भूकंप झाला. 6.4 आणि 5.8 रिश्टर स्केलवर यांची तीव्रता मोजली गेली. तुर्कीमध्ये भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे पहायला मिळाले आहे. 21 तारखेला झालेल्या भूकंपात किमान 3 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तर 213 जण जखमी झाले आहेत. काही ठिकाणी शोध आणि बचाव कार्य करण्यात आले. दोन आठवड्यांपूर्वी 6 फेब्रुवारीला तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात 44 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले : हा भूकंप तुर्कीतील हातेपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या कहानमारसमध्ये झाला होता. या घटनेला 15 दिवस उलटून गेले मात्र, तुर्कीत अजुनही मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेतील पीडितांना अद्यापही मदत आणि बचाव पथकाकडून मिळालेले नाही. अनेक लोकांपर्यंत पथक पोहोचू शकलेले नाही. तुर्कीमध्ये विविध देशांची मदत आणि बचाव पथके युद्धपातळीवर बचाव कार्यात गुंतलेली आहेत.
जम्मूत भूकंप : जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे 17 फेब्रूवारीला पहाटे 5 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते. 3.6 रिश्टर स्केलवर याची तीव्रता नोंदवली गेली होती. भूकंपाचे केंद्र कटरा पासून 97 किमी अंतरावर होते. भूकंपामुळे कुठलीही जीवित वा वित्तहानी झालेली नसल्याने चिंतेची बाब नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, 17 फेब्रूवारीला पहाटे 5.15 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू 33.10 अक्षांश आणि 75.97 रेखांश होताअसे सांगण्याकत आले होते. भूकंपाच्या धक्क्यांनंतर काहीकाळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या घटनेच्या चार दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये भूकंप झाला होता. सिक्कीममध्ये 13 फेब्रुवारील पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले होते. 4.3 रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता होती. 70 किमी अंतरावर सिक्कीमच्या उत्तरेला असलेल्या युकसोम येथे पहाटे 4.15 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले होते.अक्षांश 27.81 आणि रेखांश 87.71 येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
हेही वाचा : Turkey Earthquake : तुर्कीमध्ये पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के , 3 ठार, 213 जखमी