ETV Bharat / international

काबूल स्फोट : 60 जण ठार, ISIS-K ने दिली हल्ला केल्याची कबुली - explosions outside Kabul airport

आत्मघातकी बॉम्बस्फोब हल्ला झाला आणि यात कमीतकमी 60 अफगाणी आणि 12 अमेरिकन सैनिक मारले गेल्याची माहिती अफगाण आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Two large explosions outside Kabul airport
धक्कादायक: काबुल विमानतळाबाहेर दोन मोठे स्फोट
author img

By

Published : Aug 26, 2021, 8:29 PM IST

Updated : Aug 27, 2021, 3:04 AM IST

काबूल (अफगाणिस्तान) - काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर गुरुवारी दुहेरी आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले, जिथे अफगाणिस्तानातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या मोठ्या संख्येने जमाव जमा झाला होता यावेळी येथे आत्मघातकी बॉम्बस्फोब हल्ला झाला आणि यात कमीतकमी 60 अफगाणी आणि 12 अमेरिकन सैनिक मारले गेल्याची माहिती अफगाण आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर हा हल्ला ISIS-K या दहशतवादी संघटनेनी केल्याचे मान्य केले आहे.

रशियन अधिकाऱ्यांने सांगितले आहे की, अफगाणिस्तानातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या मोठ्या संख्येने जमाव काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर जमा झाला होता. यावेळी तालिबानींनी दोन आत्मघातकी बॉम्बस्फोट केले आहे. यामुळे या परिसरात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. यामध्ये काही अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांसह काही लहान मुलांचाही समावेश आहे.

Two large explosions outside Kabul airport
धक्कादायक: काबूल विमानतळाबाहेर दोन मोठे स्फोट

दरम्यान, काबूल विमानतळ परिसरात अंत्यत गोंधळाचे वातावरण आहे. अद्याप मृतांचा आकडा अस्पष्ट आहे, अशी माहिती अमेरिकेचे सार्वजनिक व्यवहार संरक्षण विभागाचे सहाय्यक यांनी दिली आहे.

काबूल विमानतळाच्या एबी गेटजवळ स्फोट झाल्यामुळे अज्ञात लोकांचे बळी गेले आहेत, ”असे ट्विट अमेरिकेच्या सार्वजनिक व्यवहार विभागाचे संरक्षण सचिव जॉन किर्बी यांनी केले आहे.

पेंटागॉनचे म्हणणे आहे की, काबूल विमानतळाच्या बाहेर स्फोट झाला. प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, स्फोटात झालेल्या जीवितहानीबाबत तात्काळ कोणतीही माहिती मिळालेली नाही. हजारो अफगाणी देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात अनेक दिवसांपासून विमानतळावर जमले आहेत.

अफगाणिस्तानच्या तालिबानांच्या ताब्यातून हजारो लोक पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पाश्चिमात्य राष्ट्रांनी मोठ्या विमानसेवेच्या कमी दिवसांमध्ये तेथे संभाव्य हल्ल्याचा इशारा दिला होता. तसेच तालिबानी हे आत्मघाती बॉम्बस्फोट करतील यामुळे अनेक देशांनी काल नागरिकांना विमानतळावर जाण्याचे टाळवे असे आवाहन केले होते.

हेही वाचा - काबूल विमानतळावर अव्वाच्या सव्वा दाम; पाण्याची बॉटल 1 हजार तर एक राईस प्लेट 7 हजार 500 रुपयांना

Last Updated : Aug 27, 2021, 3:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.