तेहरान - इराणमध्ये गेल्या चोवीस तासांत कोरोनाबाधितांच्या आकड्यात 12 हजार 460 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यासह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून ती 8 लाख 66 हजार 821 झाली आहे.
सिन्हुआच्या वृत्तानुसार, इराणच्या आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्या सीमा सआदत लारी यांनी आपल्या दिलेल्या दैनंदिन संक्षिप्त व्हिडिओमध्ये सांगितले की, इराणमध्ये कोरोनामुळे आणखी 453 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह मृतांची संख्या 45 हजार 255 वर पोहोचली आहे.
हेही वाचा - कंदहारमध्ये आत्मघातकी हल्ल्यात 6 पोलीस जखमी
त्या म्हणाल्या की, कोरोनामुळे 6 लाख 10 हजार 406 रुग्ण बरे झाले आहेत. परंतु, संक्रमित अतिदक्षता विभागात 5 हजार 812 लोकांची प्रकृती गंभीर आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, आतापर्यंत इराणमध्ये 58 लाख 28 हजार 307 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. इराणमधील 31 प्रांतांपैकी 27 प्रांतामध्ये संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे, असे त्यांनी सांगितले.
इराणने 19 फेब्रुवारीला कोविड - 19 चा पहिला रुग्ण सापडल्याचे जाहीर केले.
हेही वाचा - अमेरिकेत मॉलमध्ये गोळीबार, 8 जखमी