तेहरान - इराणची राजधानी तेहरानच्या उत्तर पर्वतीय भागात 12 गिर्यारोहकांचे मृतदेह सापडले आहेत. येथील बचावकर्त्यांनी आणि पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली.
25 डिसेंबरला कोलाचल, अहर आणि दराबाद या जिल्ह्यांत अचानक झालेल्या हिमवृष्टीमुळे हिमस्खलन झाले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात शोध आणि बचाव कारवाई करण्यात आली.
हेही वाचा - इराणमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे 6 गिर्यारोहक ठार
तीन दिवसांच्या शोधानंतर रेड क्रेसेंटने रविवारी तेहरानमध्ये आपले कामकाज बंद केले. ते म्हणाले की, राजधानीच्या उत्तरेकडील उंच भागात अडकलेल्या 14 लोकांना वाचविण्यात आले असून 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
वृत्तसंस्था तस्नीमच्या वृत्तानुसार, कोलाचल जिल्ह्यातील पोलिसांनी सांगितले की, त्यांना 12 वा मृतदेहदेखील सापडला आहे.
हेही वाचा - सीरियात मध्यरात्री झालेल्या इस्रायली हल्ल्यात 6 सैनिक ठार