ETV Bharat / international

'ट्रम्प यांच्या मरणाआधी त्यांची शांतता योजना नष्ट होईल' - डोनाल्ड ट्रम्प शांतता योजना

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांनी म्हटले आहे, की डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वाकांक्षी योजना त्यांच्या मरणाआधीच नष्ट होईल. मध्यपूर्व आशियाई देशांमध्ये शांतता रहावी यासाठी ट्रम्प यांनी आपली महत्त्वाकांक्षी शांतता योजना जाहीर केली होती.

Trump's Mideast plan will die before he does: Khamenei
'ट्रम्प यांच्या मरणाआधी त्यांची शांतता योजना नष्ट होईल'
author img

By

Published : Feb 6, 2020, 9:38 AM IST

Updated : Feb 6, 2020, 2:28 PM IST

तेहरान - ट्रम्प यांच्या मरणाआधी त्यांची शांतता योजना नष्ट होईल, असे मत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांनी बुधवारी व्यक्त केले. स्थानिक माध्यमांनी याबाबतची माहिती दिली. मध्यपूर्व आशियाई देशांमध्ये शांतता रहावी म्हणून ट्रम्प यांची महत्त्वाकांक्षी योजना मागील आठवड्यात समोर आणली गेली होती. त्यावर खामेनींनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

साधारणपणे तीन वर्षे अभ्यास करून तयार केल्या गेलेल्या या योजनेमध्ये जेरुसलेमला इस्त्रायलची 'अविभाजित' राजधानी घोषित करण्याची तरतूद आहे. जेणेकरून, इतिहासातील सर्वात जास्तवेळ चाललेल्या वादांपैकी एक असलेल्या पॅलेस्टाईन-इस्त्राईल वादावर द्विराज्यीय उपाय दाखवता येईल.

आतापर्यंत अरब लीग आणि इस्लामिक सहकार संस्थेने ही योजना फेटाळली आहे. पॅलेस्टाईन सरकारने केलेल्या विनंतीनुसार, ५७ सदस्यीय समितीने सोमवारी बैठक घेतली होती. यामध्ये ट्रम्प यांच्या शांतता योजनेवर चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा : इस्लामिक सहकार संस्थेने फेटाळली ट्रम्प यांची 'शांतता योजना'

Intro:Body:

zxcvzxcv

Conclusion:
Last Updated : Feb 6, 2020, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.