ETV Bharat / international

हैतीमधील शक्तीशाली भूकंपातील मृतांची संख्या 1,297 वर - हैती भूकंपात १००० ठार

हैतीमध्ये शनिवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मृतांची संख्या 1,297 पर्यंत वाढली आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, 2,800 हून अधिक लोक जखमी झाले आहेत अशी माहिती एएनआयच्या बातमीत दिली आहे.

haiti
haiti
author img

By

Published : Aug 16, 2021, 6:49 AM IST

Updated : Aug 16, 2021, 11:18 AM IST

पोर्ट-औ-प्रिन्स [हैती], १ ऑगस्ट : हैतीमधील नागरी संरक्षण एजन्सीचे प्रमुख जेरी चँडलर यांच्या मते शनिवारी हैतीमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मृतांची संख्या 1,297 पर्यंत वाढली आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, 2,800 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

बहुतेक मृत्यू देशाच्या दक्षिणेत झाले, जिथे 500 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या भूकंपामुळे 2,868 घरे नष्ट झाली आणि आणखी 5,410 घरांचे नुकसान झाले. या विनाशाने रुग्णालयांचीही पडझड झाली आणि रस्ते अडवले गेले ज्यामार्गे जीवनावश्यक वस्तू घेऊन जाता येत होत्या.

"जेव्हा वैद्यकीय गरजांचा प्रश्न येतो, तेव्हा वाहतूक ही आपली सर्वात मोठी निकड असते. आम्ही भूकंप झालेल्या भागांमध्ये औषधे आणि वैद्यकीय कर्मचारी पाठवण्यास सुरुवात केली आहे," असे पंतप्रधान एरियल हेन्री म्हणाले. "ज्यांना तातडीने विशेष काळजीची आवश्यक आहे त्यांच्यासाठी, आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आम्ही आज आणि उद्या आणखी काही लोकांना बाहेर काढू."

देशाच्या दक्षिण-पश्चिम भागात सेंट-लुई-डू-सुदच्या ईशान्येस सुमारे 12 किलोमीटर ईशान्येस भूकंपाचे केंद्र असून सकाळी 8:30 वाजता धक्के बसले.

Last Updated : Aug 16, 2021, 11:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.