तेहरान - इराणची राजधानी तेहरानच्या उत्तरेकडील उंच भागात झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे 6 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती बचाव व मदत अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शनिवारी सिन्हुआने इराणच्या रेड क्रेसेंट अँड रिलीफ ऑर्गनायझेशनचे प्रमुख मेहदी वालिपोर यांचा हवाला देत म्हटले आहे की, हिमवृष्टीमुळे 18 लोक बेपत्ता होते. वालिपोर म्हणाले की, मृतदेह पर्वतांवरून खाली आणल्यानंतर आणि फॉरेन्सिक चाचणीने त्यांची ओळख पटविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते त्यांच्या कुटुंबांच्या ताब्यात देण्यात येतील.
हेही वाचा - ब्रिटन : वादळ, पुरामुळे शेकडो लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
सध्या रेड क्रेसेंट सोसायटीची 16 पथके हरवलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. ते म्हणाले की, 'परिसरात बचावकार्य सुरू आहे'.
स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार मागील 2 दिवसांत झालेली जोरदार हिमवृष्टी आणि त्यानंतर झालेल्या हिमस्खलनामुळे ही घटना घडली.
हेही वाचा - हेल्मंड : रस्त्याकडेला झालेल्या बॉम्बस्फोटात अफगाण सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू