समार्रा - लष्करी अधिकारी कासीम सुलेमानीला अमेरिकेने रॉकेट हल्ल्यात ठार केल्यानंतर इराणने याचा बदला घेण्याचा निर्धार केला आहे. इराकमधील एका लष्करी तळावर रविवारी पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला झाला. यामध्ये इराकचे चार जवान जखमी झाले आहेत. बगदादच्या उत्तरेकडील भागात असणाऱ्या हवाई तळावर काही अमेरिकी जवान प्रशिक्षण घेत होते. याठिकाणीच हा हल्ला झाल्याची माहिती आहे.
'कात्युशा' प्रकारची आठ क्षेपणास्त्रे या अल-बलाद या हवाई तळावर येऊन पडली. यामध्ये इराकचे दोन अधिकारी, आणि दोन एअरमन जखमी झाले आहेत.
इराकच्या एफ-१६ या विमानांच्या ताफ्याचे मुख्य हवाई तळ हे अल-बलाद आहे. इराकने ही विमाने अमेरिकेकडूनच घेतली होती. या तळावर अमेरिकेचे बरेच लष्करी अधिकारी होते. मात्र, अमेरिका आणि इराणमधील तणाव पाहता, त्यांपैकी कितीतरी अधिकाऱ्यांना येथून हलवण्यात आले होते. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेथे केवळ १५ अमेरिकी सैनिक आणि केवळ एक लढाऊ विमान होते.
दरम्यान यापुर्वी अल-जदरीया आणि बलाद हवाई तळाबाहेर ५ जानेवारीला (रविवारी) इराणने अमेरिकेच्या तळांवर हल्ले केले होते. अमेरिकी दूतावास असलेल्या भागातही रॉकेट हल्ला झाला. इराणने जर परदेशातील अमेरिकेचे नागरिक किंवा मालमत्तेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका इराणमधील ५२ महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करेल, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. १९७९ नंतर अमेरिका आणि इराणने एकमेकांवर पहिल्यांदाच उघडपणे हल्ला केला आहे. याआधी दोन्ही देश एकमेकांवर लपून-छपून कारवाया करत होते.
अमेरिकी सैन्य असलेल्या इराकच्या लष्करी तळावर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला - rocket attack targeting an air base
इराकमधील एका लष्करी तळावर रविवारी पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला झाला. या लष्करी तळाचा वापर अमेरिकेचे सैनिक करत होते. या हल्ल्यात इराकचे चार जवान जखमी झाले आहेत.
समार्रा - लष्करी अधिकारी कासीम सुलेमानीला अमेरिकेने रॉकेट हल्ल्यात ठार केल्यानंतर इराणने याचा बदला घेण्याचा निर्धार केला आहे. इराकमधील एका लष्करी तळावर रविवारी पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला झाला. यामध्ये इराकचे चार जवान जखमी झाले आहेत. बगदादच्या उत्तरेकडील भागात असणाऱ्या हवाई तळावर काही अमेरिकी जवान प्रशिक्षण घेत होते. याठिकाणीच हा हल्ला झाल्याची माहिती आहे.
'कात्युशा' प्रकारची आठ क्षेपणास्त्रे या अल-बलाद या हवाई तळावर येऊन पडली. यामध्ये इराकचे दोन अधिकारी, आणि दोन एअरमन जखमी झाले आहेत.
इराकच्या एफ-१६ या विमानांच्या ताफ्याचे मुख्य हवाई तळ हे अल-बलाद आहे. इराकने ही विमाने अमेरिकेकडूनच घेतली होती. या तळावर अमेरिकेचे बरेच लष्करी अधिकारी होते. मात्र, अमेरिका आणि इराणमधील तणाव पाहता, त्यांपैकी कितीतरी अधिकाऱ्यांना येथून हलवण्यात आले होते. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेथे केवळ १५ अमेरिकी सैनिक आणि केवळ एक लढाऊ विमान होते.
दरम्यान यापुर्वी अल-जदरीया आणि बलाद हवाई तळाबाहेर ५ जानेवारीला (रविवारी) इराणने अमेरिकेच्या तळांवर हल्ले केले होते. अमेरिकी दूतावास असलेल्या भागातही रॉकेट हल्ला झाला. इराणने जर परदेशातील अमेरिकेचे नागरिक किंवा मालमत्तेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका इराणमधील ५२ महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करेल, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. १९७९ नंतर अमेरिका आणि इराणने एकमेकांवर पहिल्यांदाच उघडपणे हल्ला केला आहे. याआधी दोन्ही देश एकमेकांवर लपून-छपून कारवाया करत होते.
इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला, 4 जण जखमी

Conclusion: