ETV Bharat / international

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गानी यांच्या पॅलेसमधील 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा - अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घानी

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गानी यांच्या पॅलेसमध्ये काम करणाऱ्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आहे. अशरफ घानी कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले की नाही, तसेत अशरफ यांनी स्व:ताची कोरोना चाचणी केली की, नाही याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.

At least 20 employees test positive at Afghan presidential palace

author img

By

Published : Apr 20, 2020, 2:54 PM IST

काबूल - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या पॅलेसमध्ये काम करणाऱ्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आहे. अशरफ गनी कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले की नाही, तसेत अशरफ यांनी स्व:ताची कोरोना चाचणी केली की, नाही याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. अफगाण अधिकाऱ्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

अशरफ गनी सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. दरम्यान महत्त्वाच्या मुद्यांवर ते बैठका घेत असल्याची माहिती आहे. अशरफ गनी यांनी यापूर्वी कर्करोगावर मात केली होती. दरम्यान सध्या अफगाणीस्तानमध्ये 993 कोरोनाबाधित आढळले आहेत. गेल्या 2 महिन्यामध्ये तब्बल 2 लाख अफगाणिस्तानी ईरानमधून परतले आहेत. ईराणमध्ये 82 हजार कोरोनाबाधित असून 5 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी भारत अनेक मित्र देशांना मदत करत आहे.भारताने नुकतीच अफगाणिस्तानाला अन्न टंचाई निर्माण होऊ नये म्हणून गव्हाची मदत केली आहे. त्यानंतर आता पुन्हा वैद्यकीय मदत देऊ केली आहे. एक लाख पॅरासिटिमॉल गोळ्यांसह 5 लाख हाड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांची मदत अफगाणिस्तानला दिली आहे. एरियाना एअरलाईन्सद्वारे ही मदत पाठविण्यात आली आहे. भारताने केलेल्या मदतीबद्दल अफगाणिस्तानचे दुतावास ताहिर कादरी यांनी भारताचे आभार मानले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.