नवी दिल्ली/रियाध - पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या २ दिवसीय दौऱ्यासाठी राजधानी रियाध येथे पोहोचले. तेथे ते देशाच्या वार्षिक आर्थिक संमेलनात (FIIKSA - फ्युचर इन्वेस्टमेंट इनिशिएटिव फोरम) सहभागी होतील. तसेच, सौदीचे राजे सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद यांच्यासह द्विपक्षीय चर्चा करतील. या भेटीदरम्यान १२ करारांवर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.
मोदींनी याविषयी ट्विट केले आहे. 'सौदी अरेबियात पोहोचलो आहे. सौदी भारताचा मित्रदेश असून ही महत्त्वाची बैठक आहे. भारत-सौदी दरम्यान संबंध आणखी मजबूत करावयाचे आहेत,' असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. ते युवराज मोहम्मद बिन सलमान यांचीही भेट घेऊ चर्चा करणार आहेत.
![सौदी अरबला पोहोचले मोदी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/pm-modi1_2910newsroom_1572325946_29.jpg)
येथील वार्षिक आर्थिक संमेलनात मोदी 'व्हाट्स नेक्स्ट फॉर इंडिया?' या विषयावर व्याख्यान देतील. 'भारताचे सौदीशी पारंपरिक घनिष्ठ संबंध आहेत. सौदी भारताच्या ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार, भारताला इंधन पुरवठा करत आला आहे,' असेही मोदी म्हणाले. 'सौदी अरबसह संरक्षण, संस्कृती, शिक्षण आणि लोकांमध्ये संपर्क, द्विपक्षीय सहयोग हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. भारत-सौदी दरम्यान रणनीतीसंबंधी भागिदारी परिषदेचीही स्थापना केली जाईल,' असे ते म्हणाले.
![सौदी अरबला पोहोचले मोदी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/pm-modi2_2910newsroom_1572325946_1010.jpg)
सौदीचे युवराज फेब्रुवारी 2019 मध्ये भारत भेटीला आले होते. त्यांनी भारतात प्राथमिक क्षेत्रांमध्ये 100 अरब डॉलर्सहून अधिक गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधानांनी 2024 पर्यंत भारत ५ हजार डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल, असे म्हटले होते. त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भारतातील परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मोदी म्हणाले.