ETV Bharat / international

'पॉम्पिओंची इस्रायल भेट आंतरराष्ट्रीय कायद्यांना झुगारुन लावणारी' - वेस्ट बँक वाद

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ पुढील आठवड्यात इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, या दौऱ्याला पॅलिस्टाईनने विरोध केला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Nov 14, 2020, 5:21 PM IST

जेरुसलेम - अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ पुढील आठवड्यात इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, या दौऱ्याला पॅलेस्टाईनने विरोध केला आहे. वेस्ट बँक भागातील इस्रायलच्या वसाहतींना पोम्पेओ भेट देणार आहेत. मात्र, पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये अनेक दशकांपासून या भूभागावरून वाद सुरू आहे. पोम्पेओ यांची ही बैठक आंतरराष्ट्रीय मताच्या विरोधातील असल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे.

'पॉम्पिओंची भेट आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अवमान करणारी'

पुढील आठवड्यात माईक पॉम्पिओ इस्रायलमधील वेस्ट बँक भागातील विनरी आणि पॅसगॉट भागाला भेट देणार आहेत. पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये असेलल्या वादग्रस्त 'गोलन हाईट्स'लाही पॉम्पिओ भेट देणार आहेत. 'ही भेट धोकादायक असून आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आहे, असे अधिकृत वक्तव्य इस्रायललचे पंतप्रधान मोहम्मद इश्ताये यांनी केले आहे. ही भूमी पॅलेस्टाईनची असताना येथील पॉम्पिओ यांच्या दौऱ्याने त्याला इस्रायलचा कायदेशीर आधार मिळेल. तसेच सर्व आंतरराष्ट्रीय कायद्यांना झुगारुन लावण्याची ही कृती आहे, असे ते म्हणाले.

१९६७ मध्ये इस्रायलने वेस्ट बँक, गाझा स्ट्रिप, पूर्व जेरुसलेमवर ताबा मिळवला. त्यानंतर तेथे अनेक वसाहती उभ्या केल्या आहेत. यास पॅलेस्टाईनने कायमच विरोध केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी हा मुद्दा अनेक वेळा उपस्थित केला असून दोन्ही देशांमध्ये सतत चकमकी होत असतात. यात जवानांसह अनेक नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.