ETV Bharat / international

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लेबनॉनमध्ये देशव्यापी लॉकडाऊन - Nationwide lockdown in Lebanon news

शनिवारी लागू झालेल्या लॉकडाऊनअंतर्गत देशातील बर्‍याच भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली असून या बंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे. देशातील नागरिकांनी अर्थव्यवस्थेच्या तुलनेत आरोग्यास प्राधान्य देत लॉकडाऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन कार्यकारी पंतप्रधान हसन दीएब यांनी केले आहे.

लेबनॉन कोरोना संसर्ग बातमी
लेबनॉन कोरोना संसर्ग बातमी
author img

By

Published : Nov 15, 2020, 8:04 PM IST

बैरूत - कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लेबनॉनमध्ये दोन आठवड्यांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे सर्व रेस्टॉरंट्स, बार, कॅफे, जिम आणि मॉल्स बंद झाले आहेत. कोविड - 19 चा वाढता संसर्ग लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आला आहे.

शनिवारी लागू झालेल्या लॉकडाऊनअंतर्गत देशातील बर्‍याच भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली असून या बंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.

हेही वाचा - इटलीमध्ये कोविडच्या 25 हजाराहून अधिक नवीन घटनांमध्ये आतापर्यंत 41,750 मृत्यू

देशातील नागरिकांनी अर्थव्यवस्थेच्या तुलनेत आरोग्यास प्राधान्य देत लॉकडाऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन कार्यकारी पंतप्रधान हसन दीएब यांनी केले आहे. लॉकडाऊन हा या समस्येवर तोडगा नाही. परंतु, गेल्या काही आठवड्यांत कोरोनोविषाणूच्या संसर्गामध्ये नाटकीय वाढ झाल्याने देशाच्या आरोग्याला पहिली प्राथमिकता देणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

लेबनॉनमध्ये कोविड - 19 संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे. तर, मृतांचा आकडा 800 च्या जवळपास आहे. 21 फेब्रुवारीपासून देश कोरोना विषाणूविरोधात लढा देत आहे.

हेही वाचा - अमेरिकेत 9 लाखांहून अधिक मुलांना कोरोनासंसर्ग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.