ETV Bharat / international

इस्रायलची गुप्तहेर संस्था मोस्साद.. सध्या का आहे चर्चेत?

मोस्सादचे कोणतेही क्रियाकलाप कोणत्याही अर्थाने जनतेला जबाबदार नाहीत. त्यांच्या क्रियाकलापांची पडताळणी किंवा समालोचना करण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही. त्याचे संचालक थेट आणि संपूर्णपणे देशाच्या पंतप्रधानांना जबाबदार आहेत. म्हणूनच, त्यातील यशाचे श्रेय त्यांना सामायिक (शेअर) करण्याची गरज नाही. अर्थसंकल्प आणि हेरांच्या संख्येच्या बाबतीत अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएनंतर इस्रायलची मोस्साद सर्वांत मोठी संघटना ठरली आहे.

author img

By

Published : Dec 22, 2020, 6:58 PM IST

इस्रायलची गुप्तहेर संस्था मोस्साद
इस्रायलची गुप्तहेर संस्था मोस्साद

इस्रायलची गुप्तहेर संस्था मोस्साद

  • इराणच्या आण्विक कार्यक्रमाचे मुख्य वैज्ञानिक मोहसीन फाखरीजादेह तेहरानजवळ मारले गेले. इराणने यासाठी इस्रायलला दोषी धरले आहे. यासह पुन्हा एकदा सर्व बोटे इस्रायलींची कुप्रसिद्ध गुप्तचर संस्था मोसादकडे वळली.
  • वास्तविक, पूर्वी इराणी शास्त्रज्ञांना लक्ष्य केले गेले होते, त्या सर्व हत्यांचा मोसादशी संबंध असल्याचे म्हटले जाते.
  • एवढेच नव्हे तर, इस्रायलमधील इराणच्या अणुप्रक्रियेवरील कागदपत्रांच्या चोरीमागेदेखील मोस्साद असल्याचे समजते.

मोस्सादच्या नावावर अनेक स्कॅन्डल

  • 1960 मधील अ‍ॅडॉल्फ इश्मानचे अपहरण असो किंवा 1972 च्या म्यूनिच ऑलिम्पिकमध्ये इस्रायली अ‌ॅथलिट्सच्या मृत्यूची प्राणघातक प्रतिक्रिया असो, मोस्सादच्या नावावर अनेक धोकादायक स्कॅन्डल्स आहेत.
  • 2018 मध्येही मोस्सादच्या हेरांनी अझरबैजानमार्गे इराणमधून इस्रायलमध्ये आण्विक संग्रहण केले आणि इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी काहीच केले नाही.

अत्यंत प्रभावी संस्था

  • इस्रायलची बहारिन, संयुक्त अरब अमिराती व सुदान यांच्याशी बातचित घडवून आणण्यात मोसादचे संचालक योसी कोहेन यांनी महत्त्वाची भूमिका निभावली यावरून त्यांचा प्रभाव दिसून येतो.
  • मोसादचे संचालक कोहेन त्यांच्या अरब देशांतील समकक्षांना भेटायला गेले.
  • इतकेच नाही तर, देशाच्या कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत मोस्साद युद्धपातळीवर काम करत आहे. साधनसंपत्तीची जमावाजमव सक्रियपणे करण्यापासून ते गुप्तहेरगिरीपर्यंत सर्वत्र मोस्साद कामाला लागली आहे.

सीआयएनंतर सर्वात मोठी गुप्तहेर संस्था

  • कोहेन यांच्या नेतृत्वात मोस्सादच्या बजेटमध्येही वाढ होत आहे.
  • ऑगस्ट 2020 मध्ये राज्य नियंत्रकांच्या अहवालात असे दिसून आले की, संस्थेचे बजेट 1.5 अब्ज नवीन इस्रायली शेकेलचा (एनआयएस) आकडा ओलांडून 2.6 अब्ज एनआयएस झाले आहे.
  • यासह, अर्थसंकल्प आणि हेरांच्या संख्येच्या बाबतीत अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएनंतर मोस्साद सर्वांत मोठी संघटना ठरली आहे.

काय आहे उद्देश?

  • मोसादचे काम म्हणजे गुप्त माहिती गोळा करणे, गुप्तचर कारावाया करणे आणि दहशतवादाविरुद्ध लढा देणे.
  • मात्र, संस्थेच्या कोणत्याही उद्देशाची, भूमिकेची, ध्येयाची, शक्तीची आणि अर्थसंकल्पाची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
  • तसेच, संस्थेला देशाच्या घटनात्मक कायद्यातून वगळलेले आहे.
  • म्हणूनच, मोस्सादला डीप स्टेट असे म्हणतात.
  • त्याचे संचालक थेट आणि संपूर्णपणे देशाच्या पंतप्रधानांना जबाबदार आहेत. त्यांचे मेत्सादा युनिट शत्रूंवर हल्ला करण्यास जबाबदार आहे.

इराणमधील शास्त्रज्ञांच्या हत्या

  • इराणमध्ये मोस्सादच्या नावावर असंख्य हत्यांची प्रकरणे नोंद झाली आहेत.
  • फाखरीझादेह यांच्या आधी कामावर जात असताना किंवा घरी जाण्याच्या मार्गावर चार इराणी शास्त्रज्ञांच्या हत्या झाल्या आहेत.
  • पार्टिकल फिजिक्सचे तज्ज्ञ मसूद अली मोहम्मदी यांना 2020 मध्ये रिमोट कंट्रोल बॉम्बने केलेल्या स्फोटात उडवण्यात आले.
  • त्याच वर्षी अणुशास्त्रज्ञ माजिद शहरीर त्यांच्या कारवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात मारले गेले.
  • त्यावेळी इराणच्या अणू कार्यक्रमाचे प्रमुख फरेदुन अब्बासी यांच्याही हत्येचा प्रयत्न झाला होता. मात्र, ते त्यातून बचावले.
  • 2011 मध्ये डॅरुईश रेजानेजाद यांना सशस्त्र मोटरसायकलस्वारांनी गोळ्या घालून ठार केले होते.
  • एका वर्षानंतर, इराणच्या युरेनियम संवर्धन केंद्राचे उपप्रमुख, मुस्तफा अहमदी रोशन यांना कामावर जाण्याच्या मार्गावर ठार मारण्यात आले.

स्थापना का केली गेली?

  • मोस्सादची स्थापना इस्रायलचे माजी पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरियन यांच्या सल्ल्यानुसार 13 डिसेंबर 1949 रोजी झाली.
  • विद्यमान सुरक्षा सेवा सैन्य गुप्तचर विभाग, अंतर्गत सुरक्षा सेवा आणि परराष्ट्र धोरण विभाग यांच्यात समन्वय व सहकार्य बळकट करणारे केंद्रीय युनिट तयार करण्याची त्यांची इच्छा होती.
  • मार्चमध्ये 1951 मध्ये त्यांना पंतप्रधानांच्या कार्यालयात सामावून घेण्यात आले आणि जबाबदारी पंतप्रधानांकडे वर्ग करण्यात आली.

इराणविरुद्ध पडद्यामागील योद्धा (शॅडो वॉरियर - shadow warrior) म्हणून काम केलेल्या मोस्सादच्या योसी कोहेन यांना पंतप्रधानांचा उत्तराधिकारी का निवडले आहे?

  • येत्या प्रादेशिक अनागोंदीमधून इस्रायलला चालविणे
  • इस्रायलचे नेतृत्व करण्यासाठी दोन जण योग्य आहेत - योसी कोहेन आणि रॉन डर्मर
  • नेत्यानाहू यांनी त्यांच्या बदलीविषयी किंवा इस्रायलचे सर्वात प्रदीर्घ पंतप्रधान असलेले पंतप्रधानपदाचा कार्यकाळ संपुष्टात येण्याची शक्यता वर्तविल्याबद्दल अट्टाहास करणे.
  • सर्वाधिक काळासाठी इस्रायलच्या पंतप्रधानपदी राहिलेल्या नेत्यानाहू यांच्यासाठी त्यांच्या जागी इतर कुणी येण्याबद्दल अनुमान काढणे आणि स्वतःचा कार्यकाळ संपुष्टात आणणे हे अस्वाभाविक किंवा विचित्र होते.
  • डर्मर आणि कोहेन हे काळजीपूर्वक निवडलेले आणि संकटकाळी चाचणी झालेले निष्ठावंत आहेत, जे नेतान्याहू त्यांच्यासाठी देखरेख ठेवू शकतील, त्यांच्या धोरणाचे दोन मुख्य खांब ठरतील आणि त्यांच्या धोरणानुसार, त्यांनी ठरवल्यानुसार त्यांचा वारसा चालवू शकतील असे आहेत.
  • अमेरिकेबरोबरचे गुंतागुंतीचे परंतु महत्त्वपूर्ण नातेसंबंध आणि इराणी राजवटीविरूद्ध कटू, तीव्र अभियान.
  • त्यांच्या पूर्ववर्तींपेक्षा (आधीचे त्याच पदांवरील नेते) अधिक आणि कदाचित त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्यापेक्षा हे दोघेही त्यांच्या धोरणात्मक कार्यक्षेत्रातील कोळून प्यायलेले तरबेज आहेत. सध्या ते त्यांच्या पंतप्रधानांच्या विश्वासाचा आनंद घेत आहेत आणि अचानक उद्भवलेल्या संकटाच्या किंवा तीव्र विवादास्पद परिस्थितीतही धैर्याने ठरलेले धोरण अबाधितपणे चालू ठेवण्यास सक्षम आहेत.
  • नेतान्याहू यांनी 2015 मध्ये इराणच्या अणुकरारावर ठपका ठेवण्यासाठी कॉंग्रेसला संबोधित करताना केलेले भाषण डर्मर यांनीच अपेक्षित परिणाम घडवून आणण्यासाठी चांगल्या प्रकारे योजनाबद्ध केले होते. ओबामा व्हाईट हाऊसच्या संतप्त विरोधानंतरही उचललेले हे पाऊल होते.
  • डर्मर हे नेतान्याहू पुढे ट्रम्प यांच्यासोबत आणि व्हाइट हाऊसबरोबर विकसित करणार असलेल्या जवळच्या नात्यातील प्रमुख व्यक्तीही देखील होते.
  • सामान्यत: असे मानले जाते की, डर्मर यांना राजदूत म्हणून त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांची राजकीय कारकीर्द आणखी लांबण्याची अपेक्षा नाही.
  • गुप्तहेरांचा म्होरक्या (स्पायमास्टर) असलेल्या कोहेन यांनी दीर्घकाळ मोस्सादचे संचालन केले आहे. तसेच, इराणच्या अण्वस्त्र प्रमुख मोहसेन फाखरीजादेह यांच्या नाट्यमय हत्येमागेही व्यापकपणे तेच असल्याचे मानले जाते. त्यांनी नेतृत्वपदाचा कार्यभार स्वीकारण्याची तयारी असल्याचेही दिसते आणि त्यासाठी त्यांना नेतान्याहू यांचा आशीर्वाद असल्याचेही दिसते.
  • कोहेन यांच्या प्रभावाची अतिशयोक्ती करणे कठीण आहे. 2016 मध्ये त्यांनी इस्रायलच्या हेरगिरी संस्थेचा कार्यभार हाती घेतल्यापासून, त्यांनी मोस्सादने बजेट आणि मनुष्यबळात वेगाने वाढ केली आहे. त्याच्या कार्यरत पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे आणि या भागात पाहिलेल्या सर्वात धाडसी हेरगिरी कार्यात गुंतलेले आहेत (अर्थातच, परदेशी बातम्यांनुसार).
  • यांनी इस्रायली व्यावसायिक कूटनीतिक दल आणि परराष्ट्र मंत्रालयाची जागा अत्यंत रणनीतिकदृष्ट्या गंभीर नाट्यमय घटनाक्रमांमध्ये आणली आहे, जसे की, सुन्नी अरब जगाबरोबर इस्रायलची वाढती युती.
  • प्रथम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून आणि नंतर मोस्सादचे संचालक म्हणून नेतान्याहू यांना पंतप्रधान कार्यालयातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण धोरणात्मक प्रश्नांना केंद्रस्थानी आणण्यात मदत करण्यासाठी, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयांपासून ते सुरक्षा कॅबिनेटपर्यंत प्रतिस्पर्धी संस्था आणि शक्तींचे तळ कापून त्यांना बाहेर फेकण्यात त्यांनी मुख्य भूमिका बजावली आहे.

मोस्साद सध्या प्रकाशझोतात

  • इस्रायलने तेहरानजवळील एका ठिकाणी असलेल्या गुप्त अणू संग्रहाविषयी रात्रीच्या वेळी टाकलेल्या छाप्यातून माहिती मिळवल्याची घोषणा नेतान्याहू यांनी 2018 मध्ये केली होती. महत्त्वाच्या हिब्रू माध्यमांनी या बाबीची पुष्टी केली होती की, एका धाडसी मोहीमद्वारे ही बाब शोधण्यात आली असून अज्ञात सूत्रांनी कोहेन यांनी स्वतः वैयक्तिकरीत्या यात लक्ष घातल्याचे म्हटले होते.
  • मोस्सादने आपल्या 'सामरिक मालमत्ता' म्हणजे युद्धप्रसंगी वापरण्याची सर्व यंत्रणा इस्रायलमध्ये कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी व्हेंटिलेटर आणि मास्कपासून इतरही आवश्यक आणण्यासाठी कामाला लावली होती.
  • एका मोठ्या गुप्तचर एजन्सीचा हा एक विचित्र आणि अडाणी प्रयत्न होता.
  • मोस्सादचे कोणतेही क्रियाकलाप कोणत्याही अर्थाने जनतेला जबाबदार नाहीत. त्यांच्या क्रियाकलापांची पडताळणी किंवा समालोचना करण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही. ते त्यांच्या सर्व कार्यांचा अहवाल केवळ पंतप्रधान नेतान्याहू यांना देतात. म्हणूनच, त्यातील यशाचे श्रेय त्यांना सामायिक (शेअर) करण्याची गरज नाही.

हेही वाचा - नायजेरियात ख्रिस्ती लोकांचा वांशिक, धार्मिक नरसंहार; बोको हरामसह इस्लामी दहशतवादी संघटनांकडून हत्याकांड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.