ETV Bharat / international

Unmanned aircraft vehicles : इस्रायलने दिली UAV वापरास मंजुरी - Hermes Starliner

इस्रायलच्या वाहतूक आणि रस्ते सुरक्षा मंत्रालयाने ( Israel's Ministry of Transport and Road Safety ) नागरी हवाई क्षेत्रात काम करण्यासाठी मानवरहित विमान वाहनांना (unmanned aircraft vehicles ) (UAVs) देशातील पहिले प्रमाणपत्र जाहीर केले आहे.

Israel
Israel
author img

By

Published : Feb 10, 2022, 1:30 PM IST

जेरुसलेम - इस्रायलच्या वाहतूक आणि रस्ते सुरक्षा मंत्रालयाने ( Israel's Ministry of Transport and Road Safety ) नागरी हवाई क्षेत्रात काम करण्यासाठी मानवरहित विमान वाहनांना (unmanned aircraft vehicles ) (UAVs) देशातील पहिले प्रमाणपत्र जाहीर केले आहे. हे प्रमाणपत्र बुधवारी इस्रायली नागरी उड्डाण प्राधिकरणाने (Israeli Civil Aviation Authority ) (CAA) हर्मीस स्टारलाइनर मानवरहित प्रणालीला जारी केले आहे. इस्त्रायली संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपनी एल्बिट सिस्टम्सने विकसित आणि उत्पादित केले आहे.

इस्रायल हा पहिला देश असून, UAV ला शेती, पर्यावरण, गुन्हेगारी विरुद्ध लढा, लोक आणि अर्थव्यवस्थेच्या फायद्यासाठी चालवण्याची परवानगी देत आहे," असे इस्रायलचे वाहतूक आणि रस्ते सुरक्षा मंत्री, मेराव मायकेली म्हणाले. या मंजुरीमुळे एल्बिट कंपनीला विभक्त हवाई क्षेत्रापर्यंत मर्यादित न राहता ड्रोन इतर नागरी विमानांप्रमाणे नागरी हवाई क्षेत्रात उड्डाण करण्यासाठी परवानगी मिळेल.

हर्मीस स्टारलाइनर

हर्मीस स्टारलाइनर Hermes Starliner पंख 17 मीटर आहेत आणि त्याचे वजन 1.6 टन आहे. सुमारे 7,600 मीटर उंचीवर उडणारे हे UAV 36 तासांपर्यंत उडू शकते आणि अतिरिक्त 450 किलो इलेक्ट्रो-ऑप्टिकल, थर्मल, रडार आणि इतर पेलोड वाहून नेऊ शकते. ते सीमा सुरक्षा आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये भाग घेईल. मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या सुरक्षिततेमध्ये भाग घेऊ शकेल. सागरी शोध आणि बचाव, व्यावसायिक विमान वाहतूक आणि पर्यावरण तपासणी मोहिमा यात अचूकतेने कार्य करू शकेल.

विभक्त हवाई क्षेत्राकडे UAV चे ऑपरेशन

CAA ने हर्मीस स्टारलाइनरच्या डिझाईन आणि निर्मितीचे पर्यवेक्षण केले आहे. आणि सहा वर्षांच्या कठोर प्रमाणन प्रक्रियेचे नेतृत्व केले आहे. यात विस्तृत ग्राउंड आणि फ्लाइट चाचण्यांचा समावेश आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक नियमांनी अप्रमाणित विमानांना नागरी हवाई क्षेत्रात उड्डाण करण्यास मनाई केली आहे. विभक्त हवाई क्षेत्राकडे UAV चे ऑपरेशन मर्यादित केले आहे.

हेही वाचा - Columbia Landslide : कोलंबियातील भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू तर 35 जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.