तेहरान - इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांचा लहान भाऊ हुसेन फेरिडौन याला अनिश्चित काळासाठी तुरुंगात डांबण्यात आले आहे. तो भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरला आहे, अशी माहिती न्यायालयीन अधिकारी हमीद्रेजा हुसैनी यांनी दिली, असे स्थानिक वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
'मी सर्व आरोप नाकारत असून मी या सर्वाचा निषेध करत आहे,' असे त्याने म्हटले आहे. तो राष्ट्राध्यक्ष रुहानी यांच्या अत्यंत जवळचा म्हणून परिचित होता. तसेच, २०१५ च्या अणू-करारामध्ये तोही सहभागी होता. फेब्रुवारीपासून त्याच्यावर खटला चालू होता. त्याला सर्वप्रथम २०१७ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामीनावर सोडण्यातही आले होते.