ETV Bharat / international

भारतीय राजदुताकडून प्रथमच तालिबानी प्रतिनिधींची दोहामध्ये भेट

author img

By

Published : Aug 31, 2021, 8:03 PM IST

ज्या अफगाणिस्तानी भारतीयांना भारतात परत येण्याची इच्छा आहे, त्यांच्याबाबतही चर्चा झाल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. अफगाणिस्तानची जमीन हे भारताविरोधात तसेच दहशतवादासाठी कोणत्याही परिस्थितीत वापरू नये, असे भारतीय राजदूताने तालिबानच्या प्रतिनिधींना सांगितले आहे.

तालिबानी प्रतिनिधी
तालिबानी प्रतिनिधी

दोहा (कतार) - भारत प्रथमच अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आलेल्या तालिबानच्या संपर्कात आला आहे. कतारमधील भारतीय राजदुत दीपक मित्तल हे तालिबानच्या दोहा कार्यालयाचे प्रतिनिधी शेर मोहम्मद अब्बास स्टॅनकेझाई यांना भारतीय दुतावास कार्यालयात भेटले आहेत.

अमेरिकेने अफगाणिस्तानमधून आज संपूर्ण सैन्य काढून घेतले आहे. तालिबानच्यावतीने विनंती करण्यात आल्याने भारतीय राजदूत हे भेटल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आज भेटले आहे.

हेही वाचा-न्यायाधीशांनी निकालातून बोलावे, तोंडी आदेश देऊ नयेत- सर्वोच्च न्यायालय

तालिबानी आणि भारतामध्ये ही झाली चर्चा-

दोघांमध्ये सुरक्षा, सुरक्षितता आणि अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित आणण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. ज्या अफगाणिस्तानी भारतीयांना भारतात परत येण्याची इच्छा आहे, त्यांच्याबाबतही चर्चा झाल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. अफगाणिस्तानची जमीन हे भारताविरोधात तसेच दहशतवादासाठी कोणत्याही परिस्थितीत वापरू नये, असे भारतीय राजदूताने तालिबानच्या प्रतिनिधींना सांगितले आहे.

हेही वाचा-COVISHIELD चा दुसरा डोस चार आठवड्यानंतर की 84 दिवसांनी..? निर्णय दोन सप्टेंबरला

दरम्यान, अमेरिकेचे संपूर्ण सैन्य हे अफगाणिस्तानमधून आज मायदेशात परतले आहे. तालिबानी सत्तेला अद्याप संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली नाही. त्यामुळे सर्वच देशांकडून समर्थन मिळविण्याचे तालिबानकडून राजकीय प्रयत्न सुरू आहेत.

अफगाणिस्तानात अराजकता

अफगाणिस्तान तालिबानच्या हाती गेले असून तिथे अराजकता पसरली आहे. गेल्या गुरुवारी काबूल विमानतळाबाहेर स्फोट झाला. यात जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, लोक जिवाची पर्वा न करता पुन्हा विमानतळावर गर्दी करत आहेत. लोकांमध्ये मृत्यूपेक्षा तालिबान्यांची भीती जास्त दिसून येत आहे. प्रत्येक जण मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेची निर्वासन मोहीम 31 ऑगस्टला संपले आहे. अमेरिकेकडून सुटका होईल, अशी आशा नागरिकांना असल्याने ते विमानतळाबाहेर गर्दी करत होते.

हेही वाचा-भारत अफगाणिस्तानच्या घडामोडीत गुंग; चीनकडून हिंद महासागारात पोहोचण्याचा नवा मार्ग खुला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.