सोमनाथ - दहशतवादी आणि विघातक विचारसरणी काही काळ वर्चस्व गाजवू शकतात, परंतु त्यांचे अस्तित्व कधीही कायमचे नसते. कारण ते मानवतेला कायमचे दडपून टाकू शकत नाहीत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. गुजरातमध्ये गिर-सोमनाथ जिल्ह्यात सोमनाथ मंदिराच्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
या मंदिराचे महत्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, हे मंदिर भूतकाळात असंख्य वेळा पाडण्यात आले. देवतांच्या मूर्तींचीही विटंबना करण्यात आली. त्याचे अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा मंदिरला गतवैभव प्राप्त झाले, असेही ते म्हणाले.
दहशतवादी विचारांचे अस्तित्व ताप्तुरते
भारतीय लोकांच्या आध्यात्मिक मानसिकतेनेच देशाला शतकानुशतके एकसंध ठेवले आहे. आणि विविध क्षेत्रांच्या प्रगती आणि स्थानिक रहिवाशांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी भारत "आध्यात्मिक पर्यटन" क्षेत्र विकसित करण्याची गरज असल्याचे मोदींनी सांगितले. दहशतवादी आणि विघातक विचारसरणी काही काळ वर्चस्व गाजवू शकतात, परंतु त्यांचे अस्तित्व कधीही कायमचे नसते कारण ते मानवतेला कायमचे दडपून टाकू शकत नाहीत. भूतकाळात आणि आजही ते खरे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
2013 मध्ये प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांकात 65 व्या स्थानावर असलेला भारत 2019 मध्ये 34 व्या स्थानावर गेला, असेही मोदी यांनी यावेळेस स्पष्ट केले.
हेही वाचा - काबूलमध्ये काय घडलं? अफगाणिस्तानातून भारतात सुखरूप परतलेल्या सविता शाही यांचा थरारक अनुभव