जेरुसलेम - इस्राईलमध्ये असणाऱ्या चीनच्या राजदूताचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तेल अवीवमध्ये असणाऱ्या त्याच्या घरामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. इस्राईलच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. या राजदूताचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही.
दु वेई असे या राजदूताचे नाव होते. फेब्रुवारीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याआधी ते युक्रेनमध्ये चीनचे राजदूत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असे कुटुंब आहे. हे दोघेही चीनमध्ये राहत आहेत. इस्राईल आणि चीनचे संबंध चांगले आहेत.
मृत्यूच्या दोनच दिवस अगोदर वेई यांनी अमेरिकेचे इस्राईलमधील राज्य सचिव माईक पोम्पेओ यांच्यावर टीका केली होती. माईक यांनी चीनवर कोरोनासंबंधी माहिती लपवल्याचा आरोप केला होता.
हेही वाचा : 'नीट' परीक्षेसाठी स्थानिक केंद्र उपलब्ध करावे; यूएईमधील विद्यार्थ्यांची मागणी