ETV Bharat / international

कझाकिस्तानमध्ये कोरोनापेक्षाही घातक न्यूमोनियाचे ६०० बळी; चीनचा दावा..

author img

By

Published : Jul 10, 2020, 5:05 PM IST

साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कझाकिस्तान देशाच्या काही भागात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गेल्या महिन्यात देशभरारतील न्यूमोनिया रुग्णांमध्ये झालेली वाढ पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. चीनी दूतावासाने या आजाराला "नवीन/ माहित नसलेला न्यूमोनिया" म्हटले असले, तरी कझाकिस्तान सरकार मात्र याला साधा न्यूमोनियाच म्हणत आहे..

China embassy warns deadlier than COVID-19 pneumonia, Kazakhstan denies
कझाकिस्तानमध्ये कोरोनापेक्षाही घातक न्यूमोनियाचे ६०० बळी; चीनचा दावा..

नूर-सुलतान - कझाकिस्तानमध्ये कोविड-१९पेक्षाही घातक न्यूमोनियामुळे जून महिन्यात ६००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देशातील चीनी दूतावासाने दिली आहे.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कझाकिस्तान देशाच्या काही भागात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गेल्या महिन्यात देशभरारतील न्यूमोनिया रुग्णांमध्ये झालेली वाढ पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, कझाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालायने मात्र चीनी दूतावासाचे म्हणणे खोडले असून, रुग्णांची संख्या मोजण्यात चीनी दूतावासाची गफलत झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

२०२०मध्ये आतापर्यंत देशात न्यूमोनियाचे १,७७२ बळी नोंदवले गेले आहेत. यापैकी ६२८ बळी हे फक्त जूनमधील आहेत. यांमध्ये काही चीनी अधिकाऱ्यांचा समावेशही असल्याचे चीनी दूतावासाने म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या मृत्यूदराहूनही या न्यूमोनियाचा मृत्यूदर अधिक आहे. देशाच्या आरोग्य विभागामार्फत या विषाणूबाबत संशोधन सुरू आहे, मात्र अद्याप हा विषाणू कोणता आहे हे स्पष्ट झाले नसल्याचेही ते म्हणाले.

चीनी दूतावासाने या आजाराला "नवीन/ माहित नसलेला न्यूमोनिया" म्हटले असले, तरी कझाकिस्तान सरकार मात्र याला साधा न्यूमोनियाच म्हणत आहे. जूनच्या मध्यापासून या न्यूमोनियाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचेही चीनी दूतावासाने म्हटले आहे.

या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेला माहिती देण्यात आली आहे की नाही हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

हेही वाचा : 'लक्ष्यभेदी कारवाईत इराणच्या जनरल सुलेमानीची हत्या बेकायदेशीर'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.