ETV Bharat / international

अशरफ घानींच्या शपथविधीदरम्यान स्फोट अन् गोळीबार, 'आयएस'ने स्वीकारली जबाबदारी..

author img

By

Published : Mar 9, 2020, 6:41 PM IST

Updated : Mar 9, 2020, 8:56 PM IST

अशरफ यांची दुसऱ्यांदा देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आपल्या शपथविधी सोहळ्यादरम्यान ते लोकांना संबोधत होते, त्यावेळी ही घटना घडली. हे स्फोट आणि गोळीबार झाल्यानंतरदेखील अशरफ हे व्यासपीठावरून खाली उतरले नाहीत.

Blasts hit Ghani's oath-taking in Kabul
अफगाणिस्तान अध्यक्षांच्या शपथविधीदरम्यान स्फोट अन् गोळीबार..

काबुल - अफगाणिस्तानचे नवनिर्वाचित अध्यक्ष अशरफ घानी यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान दोन स्फोट आणि गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अशरफ यांची दुसऱ्यांदा देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आपल्या शपथविधी सोहळ्यादरम्यान ते लोकांना संबोधत होते, त्यावेळी ही घटना घडली. हे स्फोट आणि गोळीबार झाल्यानंतरदेखील अशरफ हे व्यासपीठावरून खाली उतरले नाहीत.

अशरफ घानींच्या शपथविधीदरम्यान स्फोट अन् गोळीबार, 'आयएस'ने स्वीकारली जबाबदारी..

'आयएस'ने स्वीकारली जबाबदारी..

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अशरफ घानी आणि अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्या शपथविधी सोहळ्यांनजीक दहा रॉकेट्सचा मारा केल्याचे त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले.

दरम्यान, अशरफ यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी आपणच निवडणूक जिंकल्याचे जाहीर करत बाजूलाच स्वतःचाही शपथविधी सोहळा आयोजित केला होता. सप्टेंबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर, तब्बल पाच महिन्यांनी फेब्रुवारीमध्ये घानी यांना विजयी घोषित करण्यात आले होते. याआधी डिसेंबरमध्ये प्राथमिक निकाल जाहीर करण्यात आले होते, त्यातही घानींनाच विजयी घोषित करण्यात आले होते. विरोधकांनी मात्र, हा चुकीचा निर्णय असल्याचे म्हणत यावरून गदारोळ केला होता.

हेही वाचा : दिल्ली हिंसाचार : ताहिर हुसैनच्या भावाला दिल्ली गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

Last Updated : Mar 9, 2020, 8:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.