ETV Bharat / international

78 Times Corona Positive : चक्क 78 वेळा आला तो कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांनी सांगितले 'हे' कारण - तुर्की नागरिक आला 78 वेळा कोरोना पॉझिटिव्ह

तुर्कस्तान देशातील एका व्यक्तीचा गेल्या 14 महिन्यात 78 वेळा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह ( 78 Times Corona Positive ) आला आहे. वर्षभरापासून तो आयसोलेशनमध्ये आहे. मुजफ्फर कायसन या 56 वर्षीय व्यक्तीला नोव्हेंबर 2020 झाली पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली.

78 times coming corona positive patient i
78 वेळा कोरोना पॉझिटिव्ह
author img

By

Published : Feb 10, 2022, 3:10 PM IST

अंकारा (तुर्कस्तान) - तुर्कस्तान देशातील एका व्यक्तीचा गेल्या 14 महिन्यात 78 वेळा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह ( 78 Times Corona Positive ) आला आहे. वर्षभरापासून तो आयसोलेशनमध्ये आहे. मुजफ्फर कायसन या 56 वर्षीय व्यक्तीला नोव्हेंबर 2020 झाली पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली. काही दिवसांनी त्यांची लक्षणे बरी झाली, पण त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला नाही. त्यानंतर त्यांची 78 वेळा कोरोना चाचणी करण्यात आली आहे, परंतु प्रत्येक वेळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या एक वर्षापासून ते रुग्णालयात आहेत. रोज ते आपल्या घरी परत येण्याची वाट पाहत असतो. पण तसे होत नाही.

लक्षणे कमी मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह -

माहितीनुसार, 56 वर्षांचा मुझफ्फर कायासन नोव्हेंबर 2020 साली त्याला पहिल्यांदा कोरोना झाला होता. तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. उपचारादरम्यान, त्याच्यातील लक्षणे देखील कमी झाली. पण जेव्हा पुन्हा कोरोना टेस्ट केली तेव्हा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह ( Negative Corona Report ) आला नाही.

डॉक्टरांनी सांगितले -

या रुग्णाला ब्लड कॅन्सर ( Blood Cancer Corona patients ) आहे. ज्यामध्ये आजारांशी लढणाऱ्या व्हाइड ब्लड सेल्स (WBC) म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी कमी होतात. तसेच रुग्णाची इम्युनिटी ( Corona patients Immunity Power ) कमी होऊ लागते. डॉक्टरांनी सांगितलं यामुळेच कायासनच्या रक्तातील कोरोनाव्हायरस नष्ट होत नाही आहे. सध्या त्यांना रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी औषध देणे सुरु आहे. जात आहे पण ही प्रक्रिया खूप मोठी आहे. त्यामुळे जगात पहिलांदाच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात रुग्ण इतक्या कालावधीपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आहे.

अनेक दिवसांपासून विलगीकरणात -

हे वाचून धक्का बसेल की, तब्बल 78 वेळा त्याची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. पण प्रत्येक वेळेस त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्हच येत आहे. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा विलगीकरणात जात आहेत. यामुळे त्यांना ना आपल्या मित्रमैत्रिणींना भेटता येत ना ते कुटुंबासोबत वेळ घालवू शकतात. ते खिडकीतूनच आपल्या कुटुंबासोबत थोडा संवाद साधतात.

हेही वाचा - India Corona Update : गेल्या 24 तासांत 67 हजार नवे रुग्ण, तर मृत्यूसंख्येत वाढ कायम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.