काबुल : अफगाणिस्तानच्या जलरेज जिल्ह्यात मंगळवारी दोन बॉम्ब स्फोट झाले. यामध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला असून, नऊ जखमी झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. अफगाणमधील एका वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले.
जलरेज हे अफगाणिस्तानच्या वार्डक प्रांतामध्ये येते.
रविवारी झाले होते दोन हल्ले..
अफगाणिस्तानमध्ये रविवारी सकाळी (भारतीय वेळेनुसार) अफगाणच्या घोर प्रांतात एका बॉम्ब हल्ल्यात १२ लोक ठार झाले, तर १००हून अधिक जखमी झाले होते. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास अफगाणिस्तानच्या कुंडुझ जिल्ह्यात आणखी एक बॉम्बस्फोट झाला, ज्यात चार जण जखमी झाले होते.
या सर्व हल्ल्यांची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही.
हेही वाचा : लिबियाच्या सामूहिक कबरींमध्ये सापडले 12 मृतदेह