ETV Bharat / international

लेबेनॉनमध्ये 25 दिवस पूर्ण लॉकडाउन - लेबेनॉन कोविड-19 न्यूज

वाढत्या कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी लेबेनॉनच्या कोविड-19 मंत्रीस्तरीय समितीने 1 फेब्रुवारीपर्यंत 25 दिवसांच्या लॉकडाउन लागू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. येथे गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

लेबेनॉन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण न्यूज
लेबेनॉन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण न्यूज
author img

By

Published : Jan 5, 2021, 7:27 PM IST

बैरूत - वाढत्या कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी लेबेनॉनच्या कोविड-19 मंत्रीस्तरीय समितीने 1 फेब्रुवारीपर्यंत 25 दिवसांच्या लॉकडाउन लागू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. येथे गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

सिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्यमंत्री हमीद हसन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'देशातील रुग्णालये कोविड - 19 रुग्णांनी भरले आहेत. महामारीचे संकट चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे.'

सुपरमार्केट आणि केमिस्ट दुकाने वगळता सर्व दुकाने आणि रेस्टॉरंट्स बंद राहतील. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुपरमार्केट आणि मेडिकल स्टोअर्स खुली ठेवण्यास परवानगी आहे.

हेही वाचा - ब्रिटनमध्ये कोविड रुग्णसंख्येत 24 तासांत नोंदवली सर्वाधिक वाढ

याशिवाय, समितीने संध्याकाळी 6 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यूला मान्यताही दिली आहे. यादरम्यान, केवळ डॉक्टर, परिचारिका व पत्रकारांना बाहेर पडण्याची परवानगी देण्यात येईल.

लेबेनॉनमध्ये कोरोना विषाणूबाधितांची संख्या वाढून 1 लाख 92 हजार 139 झाली आहे आणि आतापर्यंत 1 हजार 512 लोक मरण पावले आहेत. यात 2 हजार 861 नवे रुग्ण आणि 13 नवीन मृत्यूंचा समावेश आहे.

हेही वाचा - नवीन कोरोना विषाणूचा शिरकाव झालेले फ्लोरिडा हे अमेरिकेतील तिसरे राज्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.