लंडन - कन्झरव्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून थेरेसा मे यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. कन्झरव्हेटिव्ह पक्षातर्फे आता पंतप्रधानपदासाठी उमेदवार शोधला जाणार आहे.
थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ब्रिटनचा पुढील पंतप्रधान कोण? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 2017 मध्ये झालेल्या सार्कत्रिक निकडणुकीत कन्झरव्हेटिक्ह पक्ष सत्तेत आला, पण त्याला पूर्ण बहुमत मिळाले नाही. थेरेसा मे यांनी पंतप्रधानपदाची सूत्र सांभाळली. ब्रेक्झिट विधेयकाला विरोधकांनी आणि सत्ताधारी पक्षातील अनेक बंडखोरांनी विरोध केला. यामुळे हे विधेयक दोनदा लोकसभेत मतदानास येऊनही मंजूर झाले नाही.