ETV Bharat / international

इंग्लडमध्ये कोरोनामुळे 10 हजार मृत्यू; 84 हजार नागरिकांना बाधा - कोरोना बातमी

आज(रविवार) दिवसभरात 5 हजार 288 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 737 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Apr 12, 2020, 10:10 PM IST

लंडन - इंग्लडमध्ये कोरोना विषाणूमुळे 10 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 84 हजार 279 नागरिकांना बाधा झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे फक्त 344 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज(रविवार) दिवसभरात 5 हजार 288 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 737 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 हजार 612 जणांचा मृत्यू झाला आहे. युरोपातील स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी येथे कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. अमेरिकेत इटलीपेक्षा जास्त कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

युरोपातील विविध देशांची स्थिती

स्पेन - 1 लाख 66 हजार रुग्ण, तर 16 हजार 972 मृत्यू

इटली - 1 लाख 52 हजार रुग्ण, तर 19 हजार 468 मृत्यू

फ्रान्स - 1 लाख 29 हजार रुग्ण, तर 13 हजार 832 मृत्यू

जर्मनी - 1 लाख 25 हजार रुग्ण, 2 हजार 886 मृत्यू

तुर्कस्तान - 52 हजार रुग्ण, 1 हजार 101 मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.