ETV Bharat / international

नेपोलिअन बोनापार्टचा राज्याभिषेक झालेल्या ८०० वर्षांच्या ऐतिहासिक चर्चला आग - paris fire

कॅथेड्रल हे चर्च सीन नदीच्या मध्यभागी असलेल्या ले-डी-ला-सीट या बेटावर बांधण्यात आले होते. याचे बांधकाम ११६३ ला सुरू झाले. या वेळी येथे किंग लुईस सातवा याचे राज्य होते. चर्चचे बांधकाम १३४५ मध्ये पूर्ण झाले. हा मध्ययुगातील गॉथिक स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना मानला जातो.

पॅरिस चर्च
author img

By

Published : Apr 16, 2019, 11:09 AM IST

पॅरिस - जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असणारे पॅरिसमधील ‘नोट्रे-डेम-कॅथेड्रल’ हे १२व्या शतकातील ऐतिहासिक चर्च सोमवारी आगीच्या भक्षस्थानी पडले. या चर्चच्या छताचा लाकडापासून बनवलेला भाग जळून खाक झाला असून याचा आकर्षक असा उंच मनोरा या आगीत भस्मसात झाला आहे. सध्या ही आग नियंत्रणात आली असून या चर्चची गोथिक कॅथेड्रल मुख्य वास्तूरचना सुरक्षित राखण्यात यश आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

या आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, असे स्थानिक अग्निशामक दलाने सांगितले आहे. या चर्चला दरवर्षी १३ दशलक्ष लोक भेट देतात. ६९ मीटर उंच असलेल्या या चर्चच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी ३८७ पायऱ्या चढाव्या लागतात. विशेष म्हणजे फ्रेंच सम्राट नेपोलिअन बोनापार्टचा राज्यभिषेक याच चर्चमध्ये करण्यात आला होता. आग लागली त्यावेळी या चर्चच्या छतावरुन आगीचे मोठे लोट बाहेर पडत होते.

थोडक्यात इतिहास

कॅथेड्रल हे तेथील एका महिलेचे नाव असून त्याचा अर्थ 'आमची साम्राज्ञी' असा आहे. ही पॅरिसमधील मुख्य धर्मगुरुची (बिशप) जागा आहे. या चर्चचे आकर्षण असलेला मनोरा आगीमुळे कोसळला.

कॅथेड्रल हे चर्च सीन नदीच्या मध्यभागी असलेल्या ले-डी-ला-सीट या बेटावर बांधण्यात आले होते. याचे बांधकाम ११६३ ला सुरू झाले. या वेळी येथे किंग लुईस सातवा याचे राज्य होते. चर्चचे बांधकाम १३४५ मध्ये पूर्ण झाले. हा मध्ययुगातील गॉथिक स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना मानला जातो.

या चर्चचे १७९० मध्ये नुकसान झाले होते. तसेच, फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेस ते दुर्लक्षित होते. व्हिक्टर ह्युगोच्या १८३१ मध्ये लिहिलेल्या नॉट्रे-डेम डी पॅरिस या कादंबरीच्या 'दि हंचबॅक ऑफ नॉट्रे डेम' या इंग्रजी भाषांतरामुळे या इमारतीची जीर्ण अवस्था समोर आली.

या पुस्तकामुळे १८४४ ते १८६४ दरम्यान दुरुस्तीसाठीची आवश्यक तपासणी पूर्ण झाली. जीन बाप्टिस्ट, अँटोनी लासूस, इग्ने इमॅन्युएल व्हॉयलेट यांनी याची दुरुस्ती आणि याला आधार देण्याचे कार्य परिणामकारकपणे केले.

'या' महत्त्वाच्या घटना येथे घडल्या होत्या

  • १४३१ मध्ये इंग्लंडचा सहावा हेनरी या या चर्चमध्येच फ्रान्सचा राजा घोषित करण्यात आले.
  • १८०४ मध्ये नेपोलिन बोनापार्ट याला सम्राट घोषित करण्यात आले.
  • १९०९ मध्ये फ्रान्सच्या युद्धात जेन ऑफ आर्क याने इंग्रजांना मदत केली होती. त्याला शतकाच्या प्रारंभी वधस्तंभाला बांधून जाळण्यात आले होते. त्याला स्वर्गाची दारे खुली व्हावीत, यासाठी पोप पिअस दहावा याने कॅथेड्रल चर्चमध्ये धार्मिक विधी केले होते.

Intro:Body:

नेपोलिअन बोनापार्टचा राज्याभिषेक झालेल्या ८०० वर्षांच्या ऐतिहासिक चर्चला आग

१४३१ मध्ये इंग्लंडचा सहावा हेनरी या या चर्चमध्येच फ्रान्सचा राजा घोषित करण्यात आले.

१८०४ मध्ये नेपोलिन बोनापार्ट याला सम्राट घोषित करण्यात आले.

१९०९ मध्ये फ्रान्सच्या युद्धात जेन ऑफ आर्क याने इंग्रजांना मदत केली होती. त्याला शतकाच्या प्रारंभी वधस्तंभाला बांधून जाळण्यात आले होते. त्याला स्वर्गाची दारे खुली व्हावीत, यासाठी पोप पिअस दहावा याने कॅथेड्रल चर्चमध्ये धार्मिक विधी केले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.