ETV Bharat / international

Russia Ukraine War : 'मृत्यूनंतर चार्टर विमान पाठवल्याने काय फरक पडणार?'; युक्रेनमध्ये गोळी लागलेल्या भारतीय तरुणाचा दुतावासाकडे मदतीचा टाहो - भारतीय तरुणांची दुतावासाकडे मदतीची हाक

रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू ( Russia Ukraine War ) आहे. युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी अद्यापही युद्ध भागात अडकलेले आहेत. नुकतेच रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या दोन भारतीय तरुणांचा मृत्यू झाला. तर आज एका भारतीय विद्यार्थ्याचा खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे.

Russia Ukraine War
हरजोत सिंग
author img

By

Published : Mar 4, 2022, 6:02 PM IST

Updated : Mar 5, 2022, 1:38 PM IST

कीव - रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू ( Russia Ukraine War ) आहे. युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी अद्यापही युद्ध भागात अडकलेले आहेत. नुकतेच रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या दोन भारतीय तरुणांचा मृत्यू झाला. तर आज एका भारतीय विद्यार्थ्याचा खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. या विद्यार्थ्याला फेब्रुवारीच्या २७ - २८ तारखेच्या रात्री तीन ते चार गोळ्या लागल्याची घटना घडली. त्यानंतर दोन मार्चला हा विद्यार्थी शुद्धीवर आला तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. सध्या त्याची प्रकृती बरी आहे. मात्र या विद्यार्थ्याने शुद्धीवर आल्यानंतर भारतीय दुतावासासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि लवकरात लवकर भारतात पाठवण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली मात्र दुतावासाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्याने माध्यमांसोबत झालेल्या संवादात म्हटले आहे. मी गोळीबारात जखमी झालो आहे, याची माहिती भारतीय दुतावासाला दिल्यानंतरही भारतीय दुतावासातील आधिकारी मदतीसाठी आले नाही, असे या विद्यार्थ्याने म्हटले आहे.

हरजोत सिंग याची प्रतिक्रिया

'अद्याप दुतावासाची मदत नाही'

दिल्ली येथील तरुणाला युक्रेन रशिया युद्धादरम्यान कीव येथे गोळ्या लागल्या होत्या. हरजोत सिंग असे गोळ्या लागलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने माध्यमांशी संपर्क साधला आहे तो म्हणाला आहे की, "भारतीय दूतावासाकडून अद्याप कोणतेही सहकार्य मिळालेले नाही. मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, दररोज ते म्हणतात की आम्ही काहीतरी करू, परंतु अद्याप मदत मिळालेली नाही," युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अनेक गोळ्यांनी जखमी झालेल्या भारतीय कीव रुग्णालयात उपचार घेत आहेत. असे त्याने सांगितले.

'मी दूतावासाला विनंती करतो'

27-२८ फेब्रुवारीच्या रात्रीची ही घटना आहे. आम्ही तिसर्‍या चेकपॉईंटकडे जाताना एका कॅबमध्ये ३ जण होतो जिथे सुरक्षेच्या कारणांमुळे आम्हाला परत जाण्यास सांगण्यात आले होते. परत येत असताना, आमच्या कारवर गोळीबार झाला. या गोळीबारात मी गंभीर जखमी झालो होतो. माझ्या छातीत, पायात गोळ्या लागल्या, पाय फ्रॅक्चर झाला आहे. भारतीय दुतावासाकडे मदतीसाठी अनेकवेळा विनंती करुनही मदत मिळालेली नाही, अशी अगतिकता या विद्यार्थ्याने वृत्तसंस्थेसोबत बोलताना व्यक्त केली. मृत्यूनंतर चार्टर विमान पाठवल्यास काही फरक पडत नाही. देवाने मला दुसरे जीवन दिले आहे, मला ते जगायचे आहे. मी दूतावासाला विनंती करतो की मला येथून बाहेर काढा, मला व्हीलचेअरची सुविधा द्या, मला कागदपत्रे देण्यात मदत करा, असे हरजोत सिंग याने म्हटले आहे.

हेही वाचा - Bomb Blast in Peshawar Mosque : पेशावर येथील मशिदीत बॉम्बस्फोट; 30 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

Last Updated : Mar 5, 2022, 1:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.