ETV Bharat / international

लंडन : लॉकडाऊनविरोधात आंदोलन करणाऱ्या 150 हून अधिक लोकांना अटक

शनिवारी ब्रिटनमध्ये 479 मृत्यू झाले असूनही, कोरोनाचा प्रसार आणि रोगाची साथ रोखण्यासाठीच्या उपायांना विरोध केला जात आहे. आतापर्यंत येथे 58 हजार 30 मृत्यू झाले असून बाधितांचा आकडा 16 लाख 9 हजार 141 वर पोहोचला आहे.

लॉकडाऊन
लॉकडाऊन
author img

By

Published : Nov 29, 2020, 7:11 PM IST

लंडन - ब्रिटनमध्ये कोविड-19चा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन विरोधात आंदोलन सुरू आहे. लंडनमध्ये दीडशेहून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

बीबीसीच्या वृत्तानुसार, शनिवारी मार्बल आर्चवरून लॉकडाऊनविरोधात निषेध सुरू झाला. हे आंदोलन 'सेव्ह अवर राइट्स यूके ग्रुप'ने आयोजित केले होते. काही विरोधकांनी ख्रिसमसचे कपडे परिधान केले होते आणि त्यांच्या हातातील फलकावर 'ऑल आय वॉण्ट फॉर ख्रिसमस इज माय फ्रीडम बॅक' (मला ख्रिसमससाठी माझे स्वातंत्र्य परत हवे आहे), 'डिच द फेस मास्क' (फेस मास्क काढून टाका) आणि 'स्टॉप कंट्रोलिंग अस' (आमच्यावर नियंत्रण ठेवणे बंद करा) असे लिहिलेले होते.

बहुतेक निदर्शकांनी मास्क घातले नव्हते आणि त्यांनी पोलिसांकडून तेथून निघून जाण्याविषयी केल्या जात असलेल्या आग्रहाकडेही दुर्लक्ष केले होते. आदल्या दिवशीही पोलिसांनी असे सार्वजनिक कार्यक्रम न करण्याचा इशारा दिला होता.

हेही वाचा - ब्रिटनमध्ये 24 तासांत 696 मृत्यू, 5 मेपासूनची कोरोनाच्या बळींची सर्वाधिक आकडेवारी

पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचे प्रयत्न करूनही ते जात नसल्यामुळे अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी लोकांना बेड्या घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ऑक्सफर्ड सर्कस, कॅनर्बी स्ट्रीट आणि रीजंट स्ट्रीट येथे वाहतूक थांबवण्यात आली होती.

'लंडन शहरातील मेट पोलीस आणि ब्रिटिश परिवहन पोलीस अधिकाऱ्यांसाठी आजचा दिवस एक आव्हानात्मक दिवस ठरला. दिवसभर व्यवस्थित काम केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानू इच्छितो. जे लोक हेतुपुरस्सर कायदा मोडतात आणि ते बहुतेकदा आक्रमकपणे समोर आल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांचा त्यांचा सामना करावा लागतो आणि रस्ता वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण करतात, त्यांच्यासाठी आजची कारवाई हा चांगला धडा आहे,' असे मेट पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

गृहसचिव प्रीती पटेल म्हणाल्या की, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आम्ही आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना अविश्वसनीयरीत्या कार्य करताना पाहिले. 'आम्ही सर्व लोकांना आपापले कर्तव्य बजावण्यास सांगत आहोत. कारण, आम्ही लोकांचे जीवन वाचवण्यासाठी हे उपाय लागू केले आहेत,' असे त्या पुढे म्हणाल्या.

शनिवारी ब्रिटनमध्ये 479 मृत्यू झाले असूनही, कोरोनाचा प्रसार आणि रोगाची साथ रोखण्यासाठीच्या उपायांना विरोध केला जात आहे. आतापर्यंत येथे 58 हजार 30 मृत्यू झाले असून बाधितांचा आकडा 16 लाख 9 हजार 141 वर पोहोचला आहे.

हेही वाचा - वुहानमधील तपास अधिकाऱ्यांना गोठवलेल्या अन्नावर आढळला कोविड-19चा विषाणू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.