ETV Bharat / international

लंडन ब्रिज हल्ला; इसिसने स्वीकारली जबाबदारी

लंडन ब्रिज हल्ल्याची इसिसने जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, त्याबाबत कोणतेही पुरावे दिले नाहीत. हा हल्ला दहशतवादी मानून लंडन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

File photo -ISIS
संग्रहित - इसिस संघटना
author img

By

Published : Dec 1, 2019, 3:55 AM IST

लंडन - लंडन ब्रिजवरील हल्ला हा दहशतवाद्यांनी केलेला होता, हे स्पष्ट झाले आहे. कारण या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हल्लेखोर हा उस्मान खान हा योद्धा (फायटर) असल्याचे इसिसने म्हटले आहे.

दहशतवादी उस्मान याने लंडन ब्रिजवर शुक्रवारी अचानकपणे चाकू हल्ला करत अनेकांना जखमी झाले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला. घटनेनंतर लंडन पोलिसांनी गोळ्या घालून हल्लेखोराला ठार केले. या हल्ल्याची इसिसने जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, त्याबाबत कोणतेही पुरावे दिले नाहीत. हा हल्ला दहशतवादी मानून लंडन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

संबंधित बातमी वाचा-लंडन ब्रिज हल्ला : हल्लेखोर पोलिसांकडून ठार; चाकू हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू

दहशतवादी संघटनांविरोधात एकत्रित येत असलेल्या देशांना लक्ष्य करण्यासाठी लंडन ब्रिज येथील दहशतवादी हल्ला झाल्याचा दावा एका रशियन माध्यमाने केला आहे. दहशतवादी खान यापूर्वी 2012 मध्ये दहशतवादाच्या प्रकरणात दोषी ठरला होता. मात्र, त्याची डिसेंबर 2018 मध्ये परवान्यावर (लायसन्स) काही अटी घालून सुटका करण्यात आली होती. या परवान्यानुसार त्याला पुन्हा तुरुंगात टाकण्याची तरतूदही होती. संशयिताने छातीवर बॉम्ब लावल्याचा संशय होता, असे लंडन पोलिसाच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख नेल बासू यांनी सांगितले. मात्र, ते बनावट स्फोटक साधन निघाल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.