व्हिएन्ना - अॅडॉल्फ हिटलरचा जन्म ज्या घरामध्ये झाला, त्या घराचे रुपांतर आता पोलीस ठाण्यामध्ये करण्यात येणार आहे. हिटलरच्या घराला भेट देणाऱ्या पर्यटकांना कंटाळून ऑस्ट्रिया सरकारने हा निर्णय घेतला आहे.
या घराचा संपूर्ण चेहरामोहराच बदलण्यासाठी सरकारने डिझायनर्सकडून संकल्पना मागवल्या होत्या. त्यात ११ प्रतिस्पर्धींना हरवत मार्ते या ऑस्ट्रियन आर्किटेक्टने हे कॉन्ट्रॅक्ट मिळवले आहे. २०२२च्या अखेरीपर्यंत हे काम चालणार असून, यासाठी सुमारे पाच मिलियन युरोंचा खर्च येणार आहे.
या घराच्या मालकीहक्कावरून आणि भविष्यातील वापरावरून काही वर्षांपासून वाद सुरू होता. २०१७मध्ये ऑस्ट्रियाच्या सर्वोच्च न्यायालयाने या वादावर पडदा टाकला. या घराचा मालक हे घर विकण्यास तयार नसला, तरीही सरकार त्याबाबत कोणताही निर्णय घेऊ शकते असा निर्वाळा न्यायालयाने दिला होता. त्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या इमारतीचे पोलीस स्थानकात रुपांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
काही लोक म्हणत आहेत, की या इमारतीचा असा वापर योग्य आहे का? त्यांना मी म्हणेल की हाच या इमारतीचा सर्वोत्तम वापर होऊ शकेल, असे मत देशाचे गृहमंत्री कार्ल नेहम्मर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : 'तुम्ही तुमचे तोंड बंद ठेवा!'; ह्यूस्टन पोलीस प्रमुखांचे ट्रम्पना खडे बोल..