पॅरिस - ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे झालेल्या गोळीबारानंतर आपला देश आणि फ्रेंच नागरिक ऑस्ट्रियाबरोबर त्यांच्या शोकात सहभागी आहेत, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. 'आमच्या शत्रूंना ते कोणाबरोबर वाकड्यात पडत आहेत, हे माहीत असले पाहिजे. आम्ही झुकणार नाही,' असे ते पुढे म्हणाले.
'फ्रान्सनंतर आमच्या एका मित्र देशावर हल्ला झाला आहे. हा आमचा युरोप आहे. आपल्या शत्रूंना ते कोणाशी लढा देत आहेत हे माहीत असले पाहिजे. आम्ही झुकणार नाही,' असे ट्विट मॅक्रॉन यांनी केल्याचे वृत्त वृत्तसंस्था सिन्हुआने दिले आहे.
हेही वाचा - दहशतवादाला तोंड देण्यासाठी नवी रणनीती आखणार; फ्रान्सच्या पंतप्रधानांनी घेतली शपथ
यापूर्वी सोमवारी संध्याकाळी मध्य व्हिएन्नामध्ये अनेक ठिकाणी गोळीबार झाला. ऑस्ट्रियाचे गृहमंत्री कार्ल नेहमेर म्हणाले की, गोळीबार हा दहशतवादी हल्ला असल्याचे दिसून आले. या गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाला होता.
फ्रेंच शहर नीसच्या नॉट्रीडेम बॅसिलिकामध्ये चाकूच्या हल्ल्यात तीन जण ठार झाल्यानंतर दहशतवादी घटना घडण्याची शक्यता असल्याने फ्रान्स हाय अलर्टवर आहे.
यापूर्वी 16 ऑक्टोबरला, पॅरिसच्या उपनगरातील एका माध्यमिक शाळेबाहेर इतिहासाच्या शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला होता.
हेही वाचा - 'मी मुस्लिम धर्मियांच्या भावना समजतो' जगभरातील आंदोलनानंतर मॅक्रॉन यांची प्रतिक्रिया