पॅरिस - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इटलीमध्ये दररोज सुमारे सहाशेहून अधिक लोकांचा यामुळे मृत्यू होत आहे. तर फ्रान्समध्येही गेल्या २४ तासांमध्ये ४९९ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील एका दिवसातील बळींची ही सर्वोच्च संख्या आहे. यानंतर, देशातील कोरोनाच्या बळींची एकूण संख्या ३,५२३ झाली आहे.
फ्रान्समध्ये सध्या कोरोनाच्या २२,७५७ रुग्णांवर उपचार सुरू आहे. यांपैकी ५,५६५ रुग्ण गंभीर आहेत अशी माहिती आरोग्य अधिकारी जेरोम सॅलोमन यांनी दिली. तसेच, फ्रान्समधील बळींची संख्या ही केवळ त्याच रुग्णांची आहे ज्यांचा मृत्यू रुग्णालयात झाला आहे. आपल्या घरी, किंवा वृद्धाश्रमांमध्ये मृत्यू झालेल्या लोकांची संख्या त्यात जोडली गेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जगभरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनाग्रस्ता आकडा 7 लाखांच्या पुढे गेला आहे. तर कोरोनामुळे 36 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. युरोपीय देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
हेही वाचा : व्हिसा नियम मोडणारे परदेशी नागरिक आता थेट काळ्या यादीत